Iqbal Kaskar : दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीकडून अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष PMLA कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर ईडीने इकबाल कासकरची सात दिवसाची कस्टडी मागितली होती. न्यायालयाने 24 फेब्रुवारीपर्यंत ईडी कस्टडी दिली आहे.

Iqbal Kaskar : दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीकडून अटक
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला ईडीकडून अटक
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 7:17 PM

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याला ईडीने अटक केली आहे. सध्या न्यायालयाने कासकरची सात दिवसांची कोठडी ईडी (ED)कडे सोपवली आहे. या कारवाईकडे डी कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाची मोठी कारवाई म्हणून पाहिले जात आहे. वास्तविक, ईडीने ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ताब्यात घेण्याची मागणी केली होती. ही याचिका ठाणे न्यायालयाने मान्य केली आहे. त्यानंतर ठाणे कारागृहातून कासकरची कोठडी घेण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबईतील पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. येथून ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कोठडीची मागणी केली, ती मंजूर करण्यात आली. दाऊद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांच्या तपासासाठी असे करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. (ED arrests Dawood Ibrahim’s brother Iqbal Kaskar in money laundering case)

कासकरला 24 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष PMLA कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर ईडीने इकबाल कासकरची सात दिवसाची कस्टडी मागितली होती. न्यायालयाने 24 फेब्रुवारीपर्यंत ईडी कस्टडी दिली आहे. इकबाल कासकर याचा कुठल्याही आतंकवादी संघटनेशी संबंध नाही. ईडी केवळ दाऊद इब्राहिमचा भाऊ असल्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी अटक करत आहे, असा युक्तीवाद इक्बाल कासकर यांची वकील सुलतान खान यांनी न्यायालयासमोर केला. इक्बालला अटक केल्यानंतर जेजे हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी केल्यानंतर त्याला आता पीएमएलए न्यायालयात नेण्यात आले.

हसीना पारकरच्या घरीही ईडीचा छापा

अंडरवर्ल्डमधील डी कंपनीचं अस्तित्व संपवण्यासाठी आता केंद्रीय तपास यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्या असून NIA आणि ईडीने अंडरवर्ल्डच्या विरोधात तपासाला सुरुवात केलीय. NIA ने 15 दिवसांपूर्वी डी कंपनीच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याचा आधार घेत ईडीनेही मनी लाँडरिंगच्या अंतर्गत तपास सुरू केला असून मंगळवारी दिवसभरात ईडीने मुंबईत 10 ठिकाणी छापा टाकला. ईडीने टाकलेल्या छाप्यात डी गँगशी संबंधित काही महत्वाची कागदपत्र ईडीच्या हाती लागली असून ईडीकडून आता याचा तपास केला जातोय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईक आणि हस्तकांवर सध्या ईडीची पकड घट्ट होताना दिसतेय. ईडीने मंगळवारी दाऊदची बहीण हसीना पारकर राहत होती. त्या नागपाडा परिसरातल्या गॉर्डन हॉल अपार्टमेंटमधल्या घरी छापा टाकला. या इमारतीत पारकरशी संबंध असलेल्या लोकांची ईडीने चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (ED arrests Dawood Ibrahim’s brother Iqbal Kaskar in money laundering case)

इतर बातम्या

Ahmedabad Serial Blast: देशात पहिल्यांदाच 38 जणांना फाशी, आरोपींची नावे वाचा एका क्लिकवर

Amaravati Crime : अमरावतीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.