बार, पबमधून कोट्यवधींची वसुली, प्रत्येक झोनमधून सचिन वाझेला पैसे, नंतर ते अनिल देशमुखांकडे, ईडीच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा
अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांमधूनही प्रचंड पैसे उकळले, असाही दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे (ED lawyers claim that Sachin Vaze gives crores of rupees to Anil Deshmukh).
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी कथिल वसुलीप्रकरणाचा तपास ईडीकडून सुरु आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करत असताना देशमुखांचे दोन स्वीय साहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली आहे. त्यांचा ईडीला रिमांड मिळावा यासाठी ईडीच्या स्पेशल कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान ईडीच्या वकिलांनी मोठमोठे दावे केले आहेत. एपीआय सचिन वाझे याने बार, पब आणि ऑर्केस्ट्रामधून वसूल केलेले कोट्यवधी रुपये अनिल देशमुखांना दिले, असा दावा ईडीचे वकील सुनिल गोन्सालवीस यांनी केला आहे. याशिवाय देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांमधूनही पैसे उकळले असाही दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे (ED lawyers claim that Sachin Vaze gives crores of rupees to Anil Deshmukh).
ईडीच्या स्पेशल कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
ईडीच्या स्पेशल कोर्टात सगळी सुनावणी सुरु आहे. देशमुख यांचे सचिन संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा रिमांड मिळावा यासाठी हा सगळा युक्तीवाद सुरु आहे. यावेळी ईडीच्या वकिलांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. कशाप्रकारे गैरव्यवहार झाला, कुणाला पैसे देण्यात आले, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली (ED lawyers claim that Sachin Vaze gives crores of rupees to Anil Deshmukh).
सचिन वाझे हे पोलीस दलाचे आहेत. वसुलीच्या कामाचं विभाजन हे देखील शिस्तबद्धपणे करण्यात आलं होतं. मुंबई पोलीस दलातील जेवढे झोन आहेत त्यानुसार एक वेगळी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली होती. त्या यंत्रणेमार्फत पैसे गोळा केले जात होते. हे सगळे पैसे वाझेंमार्फत कुंदन शिंदे यांच्यापर्यंत जायचे. तसेच पालांडे हे संपूर्ण व्यवहाराबाबत चर्चा करायचे. पैसे कुठून यायचे आणि कुठे जायचे याबाबतचा सविस्तर कागदपत्रांसह ईडीचे वकील युक्तीवाद करत आहेत. ईडीच्या वकिलांचा पालांडे आणि कुंदे यांची जास्तीत जास्त दिवस ईडी कस्टडी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा संपूर्ण युक्तीवाद पैशांचा अफरातफरबद्दल आहे. बारमालक, पब मालकांकडून आलेला पैसा कसा फिरवला गेला, त्याच्य अनुषंगाने सर्व कागदपत्रांसह युक्तीवाद केला गेला.
ईडीच्या वकिलांनी कोर्टात केलेले पाच मोठे दावे
1) डिसेंबरमध्ये सचिन वाझेला 40 लाख रुपये गुडलक मनी देण्यात आले 2) वाझेला मुंबई पोलिसांच्या झोन 1 ते झोन 7 कडून 1 कोटी 64 लाख रुपये दिले गेले. 3) बार, पब आणि ऑर्केस्ट्राद्वारे झोन 8 ते झोन 12 कडून 2 कोटी 63 लाख रुपये देण्यात आले. हे सर्व पैसे सचिन वाझेला देण्यात आले होते. वाझेने हे सर्व पैसे अनिल देशमुख यांना देण्यात येणार असं सांगितलं. 4) डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान 4 कोटी 70 लाख रुपये गोळा करण्यात आले. हे पैसे देशमुखांचे सचिव कुंदन शिंदे यांना दिल्याचं वाझेने जबाबात सांगितलं. 5) वेगवेगळ्या बदल्यांमधून पोलीस अधिकाऱ्यांकडूनही पैसे उकळल्याचा वकिलांचा दावा
या बातमीचा व्हिडीओ बघा :
संबंधित बातम्या :
पालांडे डील करायचे, कुंदन कॅश स्वीकारायचा, देशमुखांच्या PA वर आरोप, ED पुन्हा समन्स पाठवणार