Mumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले

जेसन सॅवियो वॅटकिन्स हा अंधेरी पश्चिम येथील यमुना नगर येथील फ्लॅट क्रमांक 302 मध्ये राहत होता. सकाळी त्याने खोलीतील पंख्याला गळफास घेत जीवन संपवले. जेसनने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही.

Mumbai Crime : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याची आत्महत्या, पंख्याला गळफास घेत जीवन संपवले
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 12:04 AM

मुंबई : फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर रोमे डिसुझाच्या मेव्हण्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज अंधेरी येथे घडली आहे. जेसन सॅवियो वॅटकिन्स (48) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला. (Famous choreographer Remo D’Souza’s mother-in-law commits suicide, strangles fan)

अज्ञात कारणावरुन पंख्याला गळफास घेत जीवन संपवले

जेसन सॅवियो वॅटकिन्स हा अंधेरी पश्चिम येथील यमुना नगर येथील फ्लॅट क्रमांक 302 मध्ये राहत होता. सकाळी त्याने खोलीतील पंख्याला गळफास घेत जीवन संपवले. जेसनने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. दुपारी 12 वाजता मुख्य नियंत्रण कक्षाला अंधेरी यमुना नगरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसनला खाली उतरवले आणि कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी जेसनचे 74 वर्षीय वडील डेसमंड सिरिल डन्स्टन आणि बहीण लिझी रेमो डिसूझा यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सोलापूरमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाची आत्महत्या

वडिलांनी खर्चाला पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली. अमर माळी असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे वडिल एसटी कर्मचारी आहेत. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे गेली दोन-तीन महिने पगार मिळाला नाही. त्यामुळे अमरच्या वडिलांकडे त्याला द्यायला पैसे नव्हते. मात्र पैसे न मिळाल्याने अमर नाराज झाला होता. दुपारी बाहेरुन घरी आल्यानंतर अमर आपल्या खोलीत आराम करण्यासाठी गेला. त्यानंतर तो बराच वेळ बाहेर आला नाही म्हणून आई व मोठ्या भावाने आवाज दिला. पण आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने भावाने खिडकीतून पाहिले असता अमर गळफास घेऊन लटकलेला दिसला. याप्रकरणी सिव्हिल चौक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Famous choreographer Remo D’Souza’s mother-in-law commits suicide, strangles fan)

इतर बातम्या

Chandiwal Commission : चांदीवाल आयोग अनिल देशमुखांच्या उलटतपासणीबाबत लवकरच आपला अहवाल सादर करणार

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात टँकर चालकांकडून ऑईलची चोरी, ढाब्याच्या मालकासह एकूण सात जणांना ठोकल्या बेड्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.