Mumbai Robbery : कुरिअर बॉय असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या चौघांना अटक

मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 मे 2022 रोजी दुपारी 2:30 वाजता चार आरोपी कुरिअर बॉई म्हणून एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरी गेले आणि आत जाताच ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधले. घरातील एका आरोपीने ज्येष्ठ नागरिकाचे तोंड दाबून ठेवले व उर्वरित साथीदारांनी घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख 87 हजार 700 रुपयांचा ऐवज लुटून नेला.

Mumbai Robbery : कुरिअर बॉय असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या चौघांना अटक
कुरिअर बॉय असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या चौघांना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 1:04 AM

मुंबई : कुरिअर बॉय असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या चार आरोपींना मुंबई गुन्हे शाखा (Crime Branch) युनिट 11 च्या पथकाने अटक (Arrest) केली आहे. गुन्हे शाखा युनिट 11 कडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले चार आरोपी मुंबईतील पॉश भागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या घरी कुरिअर बॉय (Courier Boy) म्हणून जातात आणि हात-पाय बांधून त्यांना लुटतात. अफजल अक्रम हुसेन (23), बरकत अली सलामत अली (18), सचिन सुनील कुमार मिश्रा (27), अब्दुल मुनाफ मसरूफ मणिहार (65) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने या आरोपींकडून लुटलेले सोने, चांदीचे दागिने आणि 55 हजारांची रोकड जप्त केली आहे.

मालाडमधील जेष्ठ नागरिकाला लुटले

मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 मे 2022 रोजी दुपारी 2:30 वाजता चार आरोपी कुरिअर बॉई म्हणून एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरी गेले आणि आत जाताच ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधले. घरातील एका आरोपीने ज्येष्ठ नागरिकाचे तोंड दाबून ठेवले व उर्वरित साथीदारांनी घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण एक लाख 87 हजार 700 रुपयांचा ऐवज लुटून नेला. घटनेची माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 11 च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या मदतीने उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून तीन आरोपींना अटक केली. पोलिसांनी चौथ्या आरोपीलाही मुंबईतील भांडुप परिसरातून अटक केली आहे. या टोळीने आणखी किती ज्येष्ठ नागरिकांना लुटले आहे आणि त्यांच्यासोबत आणखी किती लोकांचा सहभाग आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. (Four arrested for robbing senior citizens by pretending to be courier boys)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.