मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात धडक कारवाई, मुख्याध्यापक अन् दोन शिक्षकांवरही गुन्हा
मुंबईतील कांदिवली येथील अशोक नगर येथील लिटल कॅप्टन प्री स्कूलमध्ये ४ वर्षीय मुलगी शिक्षण घेत आहे. त्या मुलीचे शाळेतील सुरक्षा रक्षकाने लैंगिक शोषण केले. तिला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणात मुख्याध्यापक अन् दोन शिक्षकांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
गोविंद ठाकूर, मुंबई, दि. 6 फेब्रुवारी 2024 | मुंबईतील शाळेतून धक्कादायक प्रकार उघड झाला होता. शाळेतील सुरक्षा रक्षकाने चक्क चार वर्षीय मुलीचे लैगिंक शोषण केले होते. तिला चॉकलेट देण्याच्या बाहाण्याने बाथरूममध्ये नेले आणि लैगिंक शोषण केले. या प्रकरणात त्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल झाला. त्याला अटकही झाली. परंतु या प्रकरणात शाळेतील काही लोकांच्या सहभाग आहे, त्यांच्यावर कारवाईची मागणी करत सोमवारी पालकांनी आंदोलन केले. अखेर या आंदोलनानंतर मुलीच्या लैंगिक शोषणाची तक्रार न केल्याने मुख्याध्यापक, दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर पॉक्सो कायद्याची कलमे लावण्यात आली आहे.
काय घडला होता प्रकार
मुंबईतील कांदिवली येथील अशोक नगर येथील लिटल कॅप्टन प्री स्कूलमध्ये ४ वर्षीय मुलगी शिक्षण घेत आहे. त्या मुलीचे शाळेतील सुरक्षा रक्षकाने लैंगिक शोषण केले. तिला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. मुलगी 2 फेब्रुवारी रोजी शाळेतून घरी आली. त्यावेळी तिला वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तिने सर्व प्रकार आईला सांगितला. या प्रकरणानंतर पालक संतप्त झाले. या प्रकरणात 4 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करणारा 55 वर्षीय वॉचमन अटक करण्यात आली आहे.
आता मुख्याध्यापक आणि शिक्षकावर गुन्हा
चार वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची माहिती वेळेवर न दिल्याबद्दल पोलिसांनी सोमवारी मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी 3 फेब्रुवारी रोजी शाळेच्या चौकीदाराला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी विद्यार्थ्यांच्या पालकांसह १०० हून अधिक लोकांनी शाळेबाहेर निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांव्यतिरिक्त लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याचे कलम २१ जोडले.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार न दिल्याने शाळेतील संबंधित व्यक्तींविरुद्ध पॉक्सो कायद्याचे कलम 21 जोडले आहे. झोन XII च्या पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी ही माहिती दिली.