इराण ते उरण, समुद्राने 2,000 कोटींच्या हेरॉईनची तस्करी, टॅल्कम पावडरमध्ये लपवला ड्रग्जसाठा

टॅल्कम पावडरचा साठा असलेला एक कंटेनर ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर या कंटेनरमध्ये 283 किलो हेरॉईन हा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले

इराण ते उरण, समुद्राने 2,000 कोटींच्या हेरॉईनची तस्करी, टॅल्कम पावडरमध्ये लपवला ड्रग्जसाठा
जप्त केलेला हेरॉईनचा साठा
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 2:02 PM

मुंबई : इराणहून समुद्री मार्गे नवी मुंबईत ड्रग्जची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 283 किलो वजनाचे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 2 हजार कोटी रुपये किंमत असलेले हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. उरणच्या जेएनपीटी बंदरावरुन रस्ते मार्गाने हे अंमली पदार्थ पंजाबला पाठवले जाणार होते, अशी माहिती आहे. (Heroin worth 2000 Crore Smuggled From Iran caught at Navi Mumbai Uran JNPT Port)

पंजाबमधील ड्रग सप्लायरला अटक

टॅल्कम पावडरचा साठा असलेला एक कंटेनर ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर या कंटेनरमध्ये 283 किलो हेरॉईन हा अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात पंजाबच्या तरण तारन भागातील ड्रग पुरवठादार प्रभजीत सिंग याला अटक करण्यात आली असून मध्य प्रदेशातील दोन इतर आरोपींनाही बेड्या ठोकल्याची माहिती आहे. महसूल गुप्तवार्ता संचलनालय (DRI) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा कंटेनर उघडून तपासणी केली असता त्यामध्ये अफगाणिस्तानमधून आणलेले 290 किलो हेरॉईन आढळले. हा सर्व साठा कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.

दिल्लीत सहा महिन्यांत 600 कोटींचे हेरॉईन जप्त

गेल्या आठवड्यात, 28 जून रोजी दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दोन दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांना 126 कोटी रुपये किमतीच्या हेरॉईनसह पकडले होते. गेल्या सहा महिन्यांत दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी सुमारे 600 कोटी रुपयांचे हेरॉईन ताब्यात घेतले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

संबंधित बातम्या:

खबऱ्याने माहिती दिली, कर्जत पोलिसांनी ट्रॅप लावला, दूध भेसळीची लाखो रुपयांची पावडर जप्त!

इराणी टॅल्कम पावडरचा कंटेनर उरणच्या बंदरावर उतरवला, कस्टमच्या धाडीनंतर धक्कादायक सत्य समोर

(Heroin worth 2000 Crore Smuggled From Iran caught at Navi Mumbai Uran JNPT Port)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.