मुंबईत अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी गँगरेप, सहा इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सना अटक

मुंबईतील मालवणी परिसरात (Malvani) राहणाऱ्या तरुणीने सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. (Instagram Friends Gang rape )

मुंबईत अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी गँगरेप, सहा इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सना अटक
तिने रागाच्या भरात मुलाच्या गुप्तांगाला चटके दिले.
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 2:09 PM

मुंबई : मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Mumbai Minor Girl Gang Rape) केल्या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील तीन वेगवेगळ्या भागात सहा जणांनी तिच्यावर गँगरेप केला होता. आरोपींसोबत तरुणीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावून सहा जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. (Instagram Friends Gang rape Minor girl in Malad Mumbai).

वाढदिवसाच्या निमित्ताने भेट

मुंबईतील मालवणी परिसरात (Malvani) राहणाऱ्या तरुणीने सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी 16 वर्षांची आहे. आरोपी तरुणांसोबत इन्स्टाग्रामवर तिची ओळख झाली होती. त्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी 31 मेच्या रात्री सहा जणांनी पीडितेला मालाड, मढ या ठिकाणी एका हॉटेलजवळ बोलावले.

मित्राच्या घरी नेऊन सामूहिक बलात्कार

मढ भागात कारमध्ये पीडितेची इन्स्टाग्राम मित्रांशी भेट झाली. आधी सगळ्यांनी एकत्र केक कापला. त्यानंतर सुरुवातीला कारमध्येच, नंतर एका मित्राच्या घरी नेऊन सहा जणांनी अल्पवयीन तरुणीवर गॅंग रेप केला होता. सर्व आरोपींविरोधात मालवणी पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत (POSCO Act) गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीत फेसबुक फ्रेण्डकडून गँगरेप

दुसरीकडे, दिल्लीतील तरुणीला गुरुग्राममधील जंगलात नेत फेसबुक फ्रेण्डसह त्याच्या 25 मित्रांनी गँगरेप केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. जानेवारी महिन्यात फेसबुकवर तिची ओळख सागर नावाच्या 23 वर्षीय तरुणाशी झाली. गप्पा वाढल्या आणि दोघांनी एकमेकांचे फोन नंबर एक्स्चेंज केले. मैत्री वाढली आणि एके दिवशी सागरने तिला थेट लग्नाची मागणी घातली. हरियाणातील होडाल शहरात राहणाऱ्या सागरने तिला आपल्या आई-वडिलांना भेटवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं.

जंगलात नेऊन सामूहिक अत्याचार

3 मे रोजी पीडिता दिल्लीहून होडालला गेली. मात्र घरी पालकांना भेटवण्यास नेण्याऐवजी सागरने तिला रामगड गावातील जंगलात नेलं. तिथे सागरचा भाऊ आणि काही मित्र मद्यपान करत बसले होते. पीडितेला पाहून आरोपींनी तिला मधोमध खेचले. त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. रात्रीपासून पुढच्या सकाळपर्यंत जवळपास वीस ते पंचवीस जणांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या :

इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका

(Instagram Friends Gang rape Minor girl in Malad Mumbai)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.