आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठींच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवला
एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे अशा तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ओम वंगाटे यांनाही अटक करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई पोलिसांकडून आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांच्या निलंबनाचा प्रस्ताव (Suspension Proposal) महाराष्ट्राच्या गृह विभागा (Maharashtra Home Department)कडे पाठवण्यात आला आहे. त्रिपाठी हे अंगडिया खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत. एलटी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, एपीआय नितीन कदम आणि उपनिरीक्षक समाधान जमदाडे अशा तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ओम वंगाटे यांनाही अटक करण्यात आली आहे. वंगाटे पोलिस चौकशीत सौरभ त्रिपाठी यांच्या सांगण्यावरुन खंडणी मागितल्याचे सांगितले होते. (IPS officer Saurabh Tripathi’s suspension proposal sent to Maharashtra Home Department)
Mumbai Police has sent a proposal to suspend IPS officer Saurabh Tripathi to the Maharashtra Home Department.
Tripathi is an accused in the Angadiya Extortion case
— ANI (@ANI) March 16, 2022
काय आहे प्रकरण?
ओम वंगाटे या पोलिस अधिकाऱ्यावर खंडणी उकळल्याचा आरोप आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात ओम वंगाटे हे पोलीस निरीक्षक आहेत. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप वंगाटे यांच्यावर आहे. खंडणीप्रकरणी ओम वंगाटे यांना अटक करत सोबत अन्य तीन अधिकाऱ्यांवरही खंडणी आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2021 वर्षातील डिसेंबर महिन्यात अंगडिया व्यापार करणाऱ्यांना आयकराची भीती दाखवत पैसे उकळले होते. पोलिसांची वागणूक आणि पोलिस ठाण्यातील नोंद यात तफावत आढळ्याचं समोर आल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रांचकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला. उपायुक्त सौरभ त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्थानकात न आल्यानं संशय बळावला. आता चौकशीतून इतरही अनेकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे.
व्यावसायिकाने पत्र लिहून तक्रार केल्याने पोलिसांचा भांडाफोड
व्यवसायिकाने पत्र लिहून तक्रार केल्याने या पोलिसांचा भंडाफोड झाला. आणि हे प्रकरण आता त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कारण या प्रकरणामुळेच काही अधिकाऱ्यांना आता जेलची हवा खावी लागत आहे.हे एल टी मार्ग पोलीस ठाण्यातील खंडणी प्रकरण आहेत. ज्यात पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गंभीर आरोप करणारे अंगाडीया यांचे पत्र टीव्ही 9 च्या हाती लागले आहे. या पत्रात डीसीपी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याच पत्राचा आधार घेत तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (IPS officer Saurabh Tripathi’s suspension proposal sent to Maharashtra Home Department)
इतर बातम्या