एक्सप्रेस आंबिवली रेल्वे स्टेशनवर थांबली, अभिनेत्री फोनवर बोलत दरवाज्यावर आली, चोरट्याने संधी साधली, अखेर बेड्या
धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये अभिनेत्रीचा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला कल्याण जीआरपीने अटक केली आहे (Kalyan GRP arrest mobile thieve who stolen mobile of actress).
कल्याण (ठाणे) : धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये अभिनेत्रीचा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला कल्याण जीआरपीने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेला महागडा मोबाईल सुद्धा पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपीचे नाव राजू केंगर असून त्याने आंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान आतापर्यंत आठ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे (Kalyan GRP arrest mobile thieve who stolen mobile of actress).
नेमकं प्रकरण काय?
ठाणे जिल्ह्यात रेल्वे स्थानकात आणि धावत्या लोकलमध्ये मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ झालेली आहे. मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात ठाणे आणि कळव्यात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर कल्याणमध्ये एक प्रवासी जखमी झाला होता. 4 जून रोजी अभिनेत्री अंजिता अधिकारी पाटणा एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या. आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबली असता अंजिता या बोगीच्या दारात उभ्या राहून त्यांच्या हातातील महागड्या मोबाईवर कोणाशी तरी बोलत होत्या. याचवेळी त्यांच्या हातावर एका अज्ञात व्यक्तीने जोराचा फटका मारुन त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला आणि तो पसार झाला.
अखेर चोरट्याला पोलिसांकडून अटक
अंजिता यांनी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अन्य प्रवाशांनी त्यांची समजूत काढली. गाडी कल्याण रेल्वे स्थानकात आल्यावर अंजिता यांनी कल्याण जीआरपीमध्ये तक्रार दिली. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांच्या मागर्दर्शनाखाली पोलीस अधिकारी पंढरी कांदे यांच्या पथकाकडे हा तपास दिला गेला. अखेर अभिनेत्री अंजिता अधिकारी यांचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला आंबिवलीहून अटक केली आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया
राजू केंगर असे या चोरट्याचे नाव आहे. तो आंबिवली येथील लहूजी साळवे नगर झोपडपट्टीत राहतो. त्याच्या विरोधात यापूर्वी मोबाईल हिसकावण्याचे सात गुन्हे दाखल आहेत. हा त्याचा आठवा गुन्हा होता, अशी माहिती कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी दिली आहे (Kalyan GRP arrest mobile thieve who stolen mobile of actress).
संबंधित बातम्या :
100 गुन्हे, पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, हैदर अखेर गजाआड, कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी
वय अवघं 22, तब्बल 56 गुन्हे, खडकपाडा पोलिसांकडून 27 वा मोस्ट वॉण्टेड चोरट्याचा खेळ खल्लास