वय अवघं 22, तब्बल 56 गुन्हे, खडकपाडा पोलिसांकडून 27 वा मोस्ट वॉण्टेड चोरट्याचा खेळ खल्लास

कल्याण पोलिसांनी आता इराणी पाड्यातील चोरट्यांचा खेळ खल्लास करायला घेतला आहे. विशेष म्हणजे खडकपाडा पोलिसांनी वर्षभरात इराणी पाड्यातील 27 आरोपींना अटक केली आहे (Kalyan Khadakpada Police arrest 22 year old most wanted thief of Irani Vasti).

वय अवघं 22, तब्बल 56 गुन्हे, खडकपाडा पोलिसांकडून 27 वा मोस्ट वॉण्टेड चोरट्याचा खेळ खल्लास
कल्याण पोलिसांकडून कारवाईचा सपाटा, तीन दिवसात दोन सराईत गुन्हेगारांची धरपकड, इराणी वस्तीतील चोरटे गजाआड
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 6:18 PM

कल्याण (ठाणे) : कल्याणच्या इराणी पाड्यातील 56 गुन्हे दाखल असलेल्या मोस्ट वॉण्टेड आरोपीला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अब्दुल इराणी उर्फ सय्यद असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेल्या 16 मोटारसायकल आणि दागिने हस्तगत केले आहेत. पोलिसांनी आता इराणी पाड्यातील चोरट्यांचा खेळ खल्लास करायला घेतला आहे. विशेष म्हणजे खडकपाडा पोलिसांनी वर्षभरात इराणी पाड्यातील 27 आरोपींना अटक केली आहे (Kalyan Khadakpada Police arrest 22 year old most wanted thief of Irani Vasti).

फक्त ठाणे आणि मुंबईत 56 गुन्हे

कल्याण नजीक असले्ल्या आंबिवली येथील इराणी पाडा परिसर ही चोरट्यांची वस्ती म्हणून ओळखली जाते. येथील अनेक इराणी तरुण देशभरात चोऱ्या आणि लूटीसाठी ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वीच 100 गुन्हे दाखल असलेल्या हैदर इराणी याला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. ही घटना ताजी असताना आता फक्त मुंबई आणि ठाण्यात 56 गुन्हे दाखल असलेल्या 22 वर्षच्या अब्दुल इराणी या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीकडून मोटारसायकल हस्तगत

कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेत या आरोपीसंदर्भात माहिती देण्यात आली. या आरोपी विरोधात मुंबई आणि ठाण्यात 56 गुन्हे दाखल आहे. त्याच्याकडून 16 मोटारसायकल आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत (Kalyan Khadakpada Police arrest 22 year old most wanted thief of Irani Vasti).

आरोपींवर पोलिसांवरील हल्ल्याचेही गुन्हे दाखल

विशेष म्हणजे खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वात खडकपाडा पोलिसांनी गेल्या वर्षभरात देशात मोस्ट वॉण्टेड असलेल्या एकूण 27 आरोपींना जेरबंद करण्याची कामागिरी केली आहे. या आरोपींवर फक्त चोरी लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पोलिसांवर जीवघेणे हल्ल्याचे गुन्हे देखील दाखल आहेत. या कामागिरीनिमित्त खडकपाडा पोलिसांचे चांगलेच कौतूक केले जात आहे.

संबंधित बातमी :

100 गुन्हे, पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, हैदर अखेर गजाआड, कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.