100 गुन्हे, पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, हैदर अखेर गजाआड, कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी आंबिवलीतील इराणी वस्तीत छापा टाकून तिथला दादा हैदर तहजीब इराणी याच्या मुसक्या आवळल्या आहेत (Kalyan Khadakpada Police arrest thief who attack on police).

100 गुन्हे, पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, हैदर अखेर गजाआड, कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी
हैदर ! पोलिसांवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड, 100 गुन्हे, चोरट्यांचा नेता अखेर गजाआड
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 5:58 PM

कल्याण (ठाणे) : नेता या शब्दाचा नेमका अर्थ काय? एखाद्या समूहाचा किंवा समाजाचा प्रतिनिधित्व करुन आपली (समाजाची) बाजू प्रभावीपणे मांडणारा किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा, अशी साधारण व्याख्या या शब्दाची असू शकते. प्रत्येक गावात, शहरात, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर असे अनेक नेते असतात जे जनतेसाठी काम करतात. त्यांना आपण लोकप्रतिनिधी देखील म्हणतो. गरीब, होतकरु आणि श्रीमंत जनतेसाठी लढणाऱ्या नेत्यांना आपण सगळेच ओळखतो. पण एखादा चोरट्यांचा नेता, असा शब्द तुम्ही कधी ऐकला नसेल. पण गुन्हेगारी क्षेत्रात तसा एक नेता चांगलाच फोफावला आहे. त्याच्या टोळीतल्या एखाद्या गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या की तो आकाडतांडव करायचा. थेट पोलिसांवर हल्ला घडवून आणायचा. पण या चोरट्यांच्या नेत्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे (Kalyan Khadakpada Police arrest thief who attack on police).

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांची मोठी कामगिरी

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी आज मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी आंबिवलीतील इराणी वस्तीत छापा टाकून तिथला दादा हैदर तहजीब इराणी याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपी हैदरवर जवळपास 100 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत. इतकंच नव्हे तर पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा तो मास्टमाईंड होता. त्याच्यावर देशभरातून चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे त्याला बेड्या ठोकल्यानंतरही तो काहीच घडलं नाही, अशा अविर्भावात वागताना दिसला (Kalyan Khadakpada Police arrest thief who attack on police).

गेल्या काही महिन्यांमध्ये पोलिसांवर दहा ते बारावेळा हल्ला

खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी योगेश गायकर आणि त्यांच्या पथकाने हैदरला पकडले आहे. गेल्या काही महिन्यात आतापर्यंत एकूण दहा ते बारा हल्ले पोलिसांवर झाल्याची माहिती आहे. पोलीस आरोपीच्या शोधात इराणी वस्तीत जातात आणि हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतो. त्यानंतर आरोपीला सोडवण्यासाठी हे हल्ले केले जातात. या हल्ल्यात अनेकदा आरोपीला घेऊन हल्लेखोर पसार होतात. या घटनांमध्ये कित्येकवेळा पोलीस देखील जखमी झाले आहेत.

हैदर इराणी नेमका कोण आहे?

हैदरच्या विरोधात मोबाईल आणि चेन स्नैचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये फक्त कल्याण डोंबिवलीत 25 गुन्हे, मुंबईत 30 गुन्हे, राज्यभरात गुन्हे आणि महाराष्ट्राबाहेरील गुन्हे असे मिळून 100 हून जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांनी दिली. इतकेच नाही तर 2 मार्च 2021 रोजी दुपारी कल्याणच्या इराणी वस्तीत वसई पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टर माईंड हैदर होता. आरोपीला पळून घेऊन जाताना चेहरा सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसला होता. हैदर पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. चोरट्यांचा नेता, अशी त्याची ख्याती आहे. त्याला पकडल्याने पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतूक केले जात आहे.

अनलॉकनंतर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

अनलॉक सुरु झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक घराबाहेर पडू लागले. तसे पुन्हा गुन्हे घडण्यास सुरुवात झाली. यात मोबाईल स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. ठाण्यात मोबाईल स्नॅचिंगच्या प्रयत्नात दोन जणांचा जीव गेला आहे. काही दिवसापूर्वी आंबिवली-कल्याण दरम्यान ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका मॉडेलचा मोबाईल हिसकावून चोरटा पसार झाला होता. कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी (11 जून) एका व्यक्तीला जखमी करुन मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला. या सर्व गुन्ह्यांचा सध्या तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

भंडाऱ्यात देवीच्या मंदिरात चोरी करणारे, शहरात घरफोडी करणारे चोरटे अखेर गजाआड, पोलिसांची मोठी कारवाई

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.