मोबाईलसाठी विकृती, पेशाने ड्रायव्हिंग ट्रेनर असलेल्या इसमाचं लाजिरवाणं कृत्य, किळसवाणी शक्कल त्याच्याच अंगाशी
परिस्थिती कशीही राहू द्या. पण आपले विचार चांगले असतील तर सर्व संकट किंवा खडतर मार्गातून आपण सुखरुप बाहेर पडू शकतो. सत्याला किंवा चांगल्या माणसांना यश लवकर मिळत नाही ही गोष्ट खरी असली तरी यश आपली परीक्षा घेत असतं, असं म्हटलं जातं.
कल्याण (ठाणे) : परिस्थिती कशीही राहू द्या. पण आपले विचार चांगले असतील तर सर्व संकट किंवा खडतर मार्गातून आपण सुखरुप बाहेर पडू शकतो. सत्याला किंवा चांगल्या माणसांना यश लवकर मिळत नाही ही गोष्ट खरी असली तरी यश आपली परीक्षा घेत असतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे जबाबदार नागरीक आणि उच्च विचारसरणी ठेवून नेहमी सर्वांशी सौजन्याने वागायला हवे. नको त्या गोष्टींचा हव्यास करुन चुकीचं पाऊल उचलणं हे धोक्याचं ठरु शकतं. याचीच प्रचिती डोंबिवलीतील एका ड्रायव्हिंग ट्रेनरला आली आहे. त्याने नवा मोबाईल घ्यायला पैसे नाहीत म्हणून मोबाईल चोरीचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न काही नागरिकांनी हाणून पाडला. त्यामुळे त्याला अखेर जेलची हवा खाली लागली आहे. विशेष म्हणजे ड्रायव्हिंग ट्रेनरच्या या प्रतापाची सध्या कल्याणमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही सोमवारी (21 सप्टेंबर) रात्री घडली. रात्रीच्या वेळी प्रवीण मिश्र नावाची व्यक्ती फोनवर बोलत जात असताना दुचाकीवरुन आलेल्या एकाने त्यांचा मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी जोरडोरात आरडाओरड केली. यावेळी काही सतर्क नागरिकांनी धावत जात आरोपीला पकडलं. त्यानंतर त्याला नागरिकांनी चांगलंच धारेवर घेतलं. संबंधित घटनेची माहिती तातडीने कोळसेवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं.
‘मोबाईल घेण्यासाठी पैसे नव्हते’
पंकज हा डोंबिवलीतील एका नामांकित मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडी चालविण्याचे प्रशिक्षण देतो. पंकज याने पोलिसांनी माहिती दिली की, तो पंधरा हजार रुपये पगारावर काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या हातातून मोबाईल पडला होता. त्यात त्याचा मोबाईल फुटला होता. तेव्हापासून त्याच्याकडे मोबाईल नव्हता. त्याला नव्या मोबाईलची गरज होती. मात्र नवा मोबाईल घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते.
पोलिसांकडून तपास सुरु
मोबाईलबाबत विचार करत असताना त्याच्या डोक्यात एक विकृत विचार आला. पैशांअभावी आपण नवा मोबाईल घेऊ शकत नाही. पण कुणाचातरी मोबाईल चोरी करुन आपण मोबाईल मिळवू शकतो. त्यानुसार त्याने मोबाईल चोरीचा योजना आखली. पण त्याची ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्याने दुचाकीवर चाऊन एका व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण परिसरातील सतर्क नागरिकांमुळे तो अडकला. अखेर कोळसेवाडी पोलिसांनी पंकजला बेज्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास कोळसेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे पाटील करत आहेत.
हेही वाचा :
ज्यांच्यासोबत आयुष्यभर काम केलं, त्यांच्याकडेच लाच मागितली, नाशकात दोन क्लर्क एसीबीच्या जाळ्यात