कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करून 13 महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. या प्रकरणी चार दलालांना अटक झाली असून त्यात तीन महिला आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा छापा, वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 10:39 PM

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मोठी कारवाई केली आहे. महात्मा फुले पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकला आहे. या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 13 महिलांची सुटका केली आहे. तसेच पोलिसांनी वेश्या व्यवसायाला भाग पाडणाऱ्या 4 दलालांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या 4 दलालांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. या प्रकरणी आता महात्मा फुले पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी आता कल्याण रेल्वे स्टेशनवरील असे प्रकार थांबतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात बऱ्याचदा सर्रासपणे वारंगणा हिंडताना दिसतात. कल्याणच्या स्कायवॉकवर त्यांना वावर दिसतो. विशेष म्हणजे कल्याण रेल्वे स्टेशनवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांचादेखील मोठा समावेश असतो. पण कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वारंगणामुळे सर्वसामान्य महिलांना रात्रीच्या सुमारास ये-जा करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिसांनी या गोष्टींची दखल घेत तिथे छापा टाकला. पोलिसांना या कारवाईत मोठे यश आले. पोलिसांनी एकूण 13 महिलांची यातून सुटका केली आहे.

हे सुद्धा वाचा

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना अनेक अडचणी

दरम्यान, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी अनेक अडचणीच्या गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे कल्याण पूर्वेला लोकग्रामच्या दिशेला जोडणारा ब्रिज हा गेल्या सहा वर्षांपासून पाडण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. हजारो प्रवासी रेल्वे रुळ पार करुन जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. हे प्रवासी सातत्याने पूल कधी बनेल? याची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे आता तर त्या वाटेला प्रचंड पाणी आणि चिखल होत आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळेला या वाटेतून जाणं देखील तितकं सुरक्षित नाही. त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर चूक कोणाची? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.