चिंताजनक! मुंबईत शाळेतील विद्यार्थ्यांचं जबर भांडण, एकाचा दुसऱ्यावर चाकूने हल्ला
शाळेतील मुलांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल! चाकूने सपासप वार करणारे हे विद्यार्थी कोणत्या इयत्तेचे? वाचा सविस्तर
मुंबई : कल्याणमध्ये 15 वर्षांच्या मुलाने 9 वर्षांच्या मुलीची कळा चिरुन हत्या केल्याची घटना ताजी असतानात आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीतील मुलांमध्ये झालेल्या भांडणातून एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना पश्चिम उपनगरातील कांदिवली येथे घडली. या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. हे दोन्ही विद्यार्थी एका इंग्रजी शाळेचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या भांडणाचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा देखील दाखल केला आहे.
का केला हल्ला?
कांदिवली पश्चिम येथे 26 नोव्हेंबर रोजी दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचं कडाक्याचं भांडण झालं. या हल्ल्यातूीन एका दुसऱ्या विद्यार्थ्यावर थेट चाकूनेच जीवघेणा हल्ला केला. यावेळी एकच गोंधळ उडाला.
या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णाला ट्रायडंट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर करण्यात आलेल्या उपचारानंतर आता जखमी तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी अल्पवयी असून ते दोघेही एका इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. त्या दोघांमध्ये बराच वेळ भांडण सुरु होता. हे दोन्ही विद्यार्थी मुस्लिम समाजातील असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
गुन्हा दाखल
व्हायरल व्हिडीओमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्याची गर्दी दिसून आलीय. यादरम्यान एक विद्यार्थी स्कुटीवर बसलेल्या दुसर्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करतो. त्यानंतर शाळेत एकच गोंधळ उडतो. नेमकं या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या कारणावरुन भांडण होतं, ते कळू शकलेलं नाही. कांदिवली पोलिसांनी या घटनेप्रकरणी आयपीसी 326,504,506 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास सुरु आहे.