Kandivali crime: दुहेरी हत्याकांड, दोघांची आत्महत्या! 4 सुसाईट नोट, कांदिवलीत क्रूर क्राईम, नेमकं काय घडलं?

Mumbai Double Murder case : किरण आणि मुस्कान यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला.

Kandivali crime: दुहेरी हत्याकांड, दोघांची आत्महत्या! 4 सुसाईट नोट, कांदिवलीत क्रूर क्राईम, नेमकं काय घडलं?
कांदिवलीत हत्याकांड..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 11:02 AM

मुंबई : कांदिवलीत (Kandivali Crime News) खळबळजनक प्रकार समोर आला आहे. चौघांचे मृतदेह बुधवारी समोर आले होते. स्टेशनजवळ असलेल्या एका घरात आढळलेल्या या मृतदेहांनी संपूर्ण कांदिवली हादरली. याप्रकरणी आता नवा खुलासा करण्यात आला आहे. दोघांची हत्या (Mumbai Double Murder case) करण्यात आली होती. तर हत्येनंतर दोघांनी आत्महत्या (Suicide news) केली. आत्महत्या केलेल्या दोघांविरोधातच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना उघकीस आल्यानंतर कांदिवलीत एकच खळबळ उडालेली होती. पोलीस अधिकारी विशाल ठाकूर यांनी कांदिवलीतील दुहेरी हत्याकांड आणि दोघांच्या आत्महत्याप्रकरणी अधिक खुलासा केला आहे. कौटुंबिक वादातून हे प्रकरण घडलं असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यातील आत्महत्या केलेल्या शिवदयाळ सेन यांच्या खिशात चार सुसाईड नोट पोलिसांना आढळून आल्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

कोयता घेऊन आला आणि…

एक इसम कोयता घेऊन खालीवर फिरवतोय, अशी माहिती देणारा एक फोन कॉल पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला होता. इमारतीत काही महिलांच्या ओरड्याच्या आवाजाने आणि किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरुन गेलेला होता. कांदिवली पोलीस स्टेशनपासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या आणि रेल्वे स्टेशनपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या इमारतीत ही खळबळजनक घटना घडली.

दळवी कुटुंबात कलह?

दळवी कुटुंबात हे धक्कादायक हत्याकांड घडलं. डॉ. आशिष दळवी हे इंदूरमध्ये आपल्या मुलाला घेऊन दहा वर्षांपूर्वी शिफ्ट झाले होते. त्याआधी पाच वर्ष ते एक हॉस्पिटल चालवत होते. ते हॉस्पिटलही त्यांनी बंद केलं होतं. तर त्यांची पत्नी किरण दळवी ही एक ब्युटी पार्लर चालवायची. ग्राऊंड फ्लोअरवर किरण दळवी यांचं पार्लर होतं. किरण यांची मुलगी मुस्कारनही आपल्या आपल्या आईला कॉलेज शिकता शिकता यात मदत करायची. पण बुधवारी रात्री साडे दहा ते साडे बाराच्या दरम्यान, एकच खळबळ उडाली आणि त्याचवेळी हे हत्याकांड घडलं.

हे सुद्धा वाचा

प्रेमप्रकरण, अनैतिक संबंध की आणखी काही?

किरण आणि मुस्कान यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यांच्या शरीरावर अनेक घाव धारदार शस्त्राने करण्यात आलेले होते. हॉस्पिटल बंद झाल्यानंतरही किरण ही आपल्या मुलींना घेऊन हॉस्पिटलच्या इमारतीतच राहत होती. शिवदयाळ सेन हा दहा वर्षांपूर्वी डॉ. आशिष यांच्याकडे कामाला होता. शिवदयाळ आणि किरण यांच्या अल्पवयीन मुलीचे संबंध असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. शिवदयाळ आणि भूमी यांनी आत्महत्या केली. त्यांचे लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. तर किरण आणि मुस्कान यांची हत्या करण्यात आली होती.

दुहेरी हत्याकांडांचं गूढ उकलण्याचं आव्हान

आता किरण आणि आशिष एकमेकांपासून वेगळे का झाले होते, याचाही तपास पोलीस करत आहे. दुहेरी हत्याकांडात वापरण्यात आलेली शस्त्रात्र पोलिसांनी जप्त केली आहेत. तर आत्महत्या केलेल्या शिवदयाळ सेनच्या खिसात सापडलेल्या चार सुसाईड नोटमध्ये वडिलांना उद्देशून काही मजकूर लिहिला गेल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी नव्यानं तपासाला सुरुवात केली आहे. या हत्याकांडामागचं आणि आत्महत्येचं गूढ उकलण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.