नवी मुंबईतील उड्डाणपुलावर धावती कार पेटली, पंढरपूरच्या ‘देवदुताने’ पाच जणांच्या कुटुंबाला कसं वाचवलं?
नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. पेट घेतलेल्या गाडीने एकाच कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते. दोन मुलं, एक मुलगी आणि आई-वडील असे पाच जण स्विफ्ट डिझायर कारने मुंबईहून पुण्याला निघाले होते.
नवी मुंबई : चालत्या गाडीने अचानक पेट (Car Fire) घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर (Navi Mumbai) हा प्रकार घडला. पेट घेतलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीत एकूण पाच जण प्रवास करत होते. मात्र सुदैवाने युवा उद्योजकाने प्रसंगावधान राखत या सर्वांचे प्राण वाचवले. पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक आणि सहकारातील नेते अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी कारला लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे एकाच कुटुंबातील पाचही जणांचा जीव बचावला. दोन मुलं, एक मुलगी आणि आई-वडील असे पाच जण मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाले होते, यावेळी नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर गाडी धावत असताना अचानक आग लागली. अभिजीत पाटलांनी केवळ आगच विझवली नाही, तर घाबरलेल्या कुटुंबाला दिलासाही दिला.
काय आहे प्रकरण?
नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. पेट घेतलेल्या गाडीने एकाच कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते. दोन मुलं, एक मुलगी आणि आई-वडील असे पाच जण स्विफ्ट डिझायर कारने मुंबईहून पुण्याला निघाले होते.
उद्योजक अभिजीत पाटलांची धाव
नवी मुंबईतील तळोजा उड्डाणपुलावर पोहोचल्यानंतर त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे कुटुंबीय घाबरुन गेले. मात्र पंढरपूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि सहकारातील नेते अभिजीत पाटील यांनी प्रसंगावधान राखले आणि गाडीची आग नियंत्रणात आणली.
कारच्या आगीवर नियंत्रण
अभिजीत पाटील यांच्या प्रसंगावधानामुळे कारमधील कुटुंबीयांचे प्राण वाचले. घाबरलेल्या कुटुंबातील लोकांना दिलासा देत पाटील यांनी कारची आग विझवली. फायर डिस्टिंग्विशरच्या मदतीने त्यांनी आगीवर आगीवर नियंत्रण मिळवले. हा प्रकार उपस्थितांपैकी एकाने मोबाईल कॅमेरात कैद केला आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO | मुंबई-अहमदाबाद हायवेवर गाडी पेटली, प्रवासी बालंबाल बचावले, कार जळून खाक
VIDEO | भररस्त्यात मर्सिडीज पेटली, गोंदियातील आगीत कार जळून खाक
Pune | कामावरून काढून टाकल्याने चालकाने 22 लाखांची कार पेटवली