मॅनेजरची नोकरी गेली, महिन्यापासून ओला कारचा ड्रायव्हर, भिवंडीत गाडीमध्येच गळा दाबून हत्या

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील माणकोली नाका येथे एका कारमध्ये मृतदेह आढळला होता. महामार्गावरील माणकोली परिसरात उड्डाणपुलाच्या खाली उभ्या असलेल्या व्हॅगन आर कारच्या ड्रायव्हरचा हा मृतदेह होता.

मॅनेजरची नोकरी गेली, महिन्यापासून ओला कारचा ड्रायव्हर, भिवंडीत गाडीमध्येच गळा दाबून हत्या
भिवंडीत ओला कार चालकाची हत्या
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 8:18 AM

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर उभ्या असलेल्या एका कारमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओला चालकाची गळा आवळून हत्या केल्याचं तपासादरम्यान समोर आलं. मयत 42 वर्षीय व्यक्ती भिवंडीचा रहिवासी होता.

नेमकं काय घडलं?

मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील माणकोली नाका येथे एका कारमध्ये मृतदेह आढळला होता. महामार्गावरील माणकोली परिसरात उड्डाणपुलाच्या खाली उभ्या असलेल्या व्हॅगन आर कारच्या ड्रायव्हरचा हा मृतदेह होता. या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची तपासणी केली. मृतदेहाच्या गळ्याभोवती आवळल्याचे व्रण दिसल्याने ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लॉकडाऊनमुळे काम बंद

प्रभाकर पांडू गंजी (वय 42 वर्ष) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो पद्मा नगर – भिवंडी येथील रहिवासी आहे. यंत्रमाग कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काम करत असताना लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. त्यामुळे आर्थिक टंचाईतून सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःच्या व्हॅगन आर कारला ओलामध्ये लावून घेतलं. स्वतःच ड्रायव्हर म्हणून त्याने मागील एक महिन्यापासून काम करण्यास सुरुवात केली होती.

हत्येचं कारण अस्पष्ट

चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करत नारपोली पोलिसांनी अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या नेमकी कोणी केली, हत्येचं कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

संबंधित बातम्या :

पोक्सो अंतर्गत गुन्हा, महिन्याभरात कारागृहात आत्महत्या, भल्या पहाटे कैद्याने स्वत:ला का संपवलं?

मोहिते-साठे गटात तुफान राडा, धारधार शस्त्राने भर दिवसा तिघांचा खून, सांगलीमध्ये खळबळ

(Maharashtra Crime News Bhiwandi Car Driver Murder near Nashik Mumbai Highway)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.