Dombivli Gang Rape | डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरण, 33 जणांविरुद्ध 885 पानी आरोपपत्र

अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरात हा प्रकार घडला होता.

Dombivli Gang Rape | डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरण, 33 जणांविरुद्ध 885 पानी आरोपपत्र
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 3:58 PM

डोंबिवली : डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी (Dombivli gang-rape case) चार अल्पवयीन मुलांसह सर्व 33 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आठ महिन्यांच्या काळात 15 वर्षीय मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात उघडकीस आला होता. 22 सप्टेंबर रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कल्याण सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण

तब्बल 885 पानी चार्जशीट दाखल करण्यात आली असून 122 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. आरोपींनी अल्पवयीन मुलीवर विविध ठिकाणी सामूहिक अत्याचार केले, असा उल्लेख आरोपपत्रात आहे. यामध्ये डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, रबाळे या ठिकाणांचा समावेश आहे. 29 जानेवारी ते 22 सप्टेंबर या काळात ड्रग्ज देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. 33 आरोपींपैकी चौघे अल्पवयीन सध्या जामिनावर आहेत. तर 29 जण न्यायालयीन कोठडीत आहेत.

कोणकोणत्या कलमांखाली गुन्हा

पोलिसांनी भादंवि कलम 376 (बलात्कार), 376 (n) (वारंवार अत्याचार), 376 (d) (सामूहिक बलात्कार), 376 (3) (16 वर्षांखालील महिलेवर बलात्कार) या कलमांखाली, तसेच पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ काढून ब्लॅकमेल

अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करत व्हिडीओ काढला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करत आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. डोंबिवलीतील भोपर परिसरात हा प्रकार घडला होता.

संबंधित बातम्या :

डोंबिवली बलात्कार प्रकरण, 22 आरोपींच्या कोठडीत वाढ, कोर्टात हजर करताना पोलिसांचा कडक बंदोबस्त

Love Attack एकीशी संबंध, दुसरीशी घरोबा, लग्नानंतर आले विघ्न

WhatsApp वर अनोळखी नंबरवरुन मेसेज, अल्पवयीन तरुणी भेटायला, गाडीत बलात्कार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.