Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन वाझे वोकहार्ट रुग्णालयात दाखल, ओपन हार्ट सर्जरी होणार

सचिन वाझेने मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवली, त्याची कारणं मिळाली आहेत

सचिन वाझे वोकहार्ट रुग्णालयात दाखल, ओपन हार्ट सर्जरी होणार
Sachin Vaze
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 3:54 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Antilia Bomb Scare) आणि मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren) प्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) याची ओपन हार्ट सर्जरी होणार आहे. कोर्टाच्या परवानगीनंतर वाझे वोकहार्ट रुग्णालयात दाखल झाला आहे, अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. वाझेच्या हृदय शस्त्रक्रियेची गरज जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केल्याचा दावा, वाझेच्या वकिलांनी याआधी कोर्टात केला होता.

…म्हणून अँटिलियाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवली

दरम्यान, सचिन वाझेने मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने कोर्टात तब्बल दहा हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये सचिन वाझेने स्फोटकांची गाडी का ठेवली, त्याची कारणं मिळाली आहेत. सचिन वाझेला आपली जुनी ओळख परत मिळवायची होती. स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास करुन, उत्तम तपास अधिकारी म्हणून पुन्हा लौकिक मिळेल, अशी आशा सचिन वाझेला होती, मात्र इथेच तो फसला आणि जेलमध्ये गेला.

ओळख परत मिळवण्यासाठी ‘कार’नामा

सचिन वाझे हा ख्वाजा युनूस एन्काउंटर प्रकरणात निलंबित झाला होता. मात्र ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर 2020 मध्ये तो परत पोलीस दलात दाखल झाला. वाझेला थेट क्राईम इन्वेस्टीगेशन युनिट अर्थात CIU चे प्रमुख पद मिळालं. नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेला सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतला होता. मात्र मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर, त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर 24 फेब्रुवारी 2021 च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ उभी करण्यात आली होती. ही गाडी सचिन वाझेचा मित्र मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचीच होती.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 24 फेब्रुवारी 2021 च्या रात्री स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. मात्र मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च 2021 रोजी मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे याला अटक केली. सध्या तो कोठडीत आहे.

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कुटुंबाला भेटण्यासह सचिन वाझेच्या तीन मागण्या, NIA च्या विशेष न्यायाधीशांचा निर्णय काय?

अंतर ठेवून बसा, कोर्टात सचिन वाझे-सुनील मानेचा बोलण्याचा प्रयत्न, न्यायाधीशांनी फटकारलं

NIA कडून सचिन वाझे-सुनील मानेच्या कोठडीची मागणी, वाझेचे वकील म्हणतात ओपन हार्ट सर्जरीची गरज

'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा
'वाघ्या'ची चर्चा असताना शाहूंच्या प्रिय खंड्या श्वानाचीही होतेय चर्चा.
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.