मूकबधीर तरुणाचा गोदामाला पहारा, महिलांकडून ने-आण, मुंबईत गांजा तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश

आरोपी गांजाची खेप अंधेरी परिसरात ठेवायचे आणि तिथून मुंबईतील विविध भागात विकायचे. यामध्ये दोघी महिलांचा समावेश आहे. एक मूकबधिर व्यक्ती हे गोदाम चालवत होती. तर महिला गांजाच्या पुड्या तयार करुन बाजारात पाठवत असत

मूकबधीर तरुणाचा गोदामाला पहारा, महिलांकडून ने-आण, मुंबईत गांजा तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश
पिस्तुलचा धाक दाखवून लोकांना नग्न करुन अनैसर्गिक कृत्यास भाग पाडणाऱ्या विकृत टोळीचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 12:57 PM

मुंबई : अंमली पदार्थ प्रकरणी (Drugs) मुंबईत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यापैकी तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी (Mumbai Crime) ही कारवाई केली. आरोपी गांजाची खेप अंधेरी परिसरात ठेवायचे, तिथून मुंबईतील विविध भागात नेऊन विकायचे. यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे एक मूकबधिर व्यक्ती हे गोदाम चालवत होती. तर महिला गांजाच्या पुड्या बनवून बाजारात पाठवत असत. पोलिसांनी या प्रकरणी एकूण पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर तिघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. गोदामात 23 किलो गांजा सापडला आहे. या गांजाची बाजारातील किंमत तब्बल 2 लाख 30 हजार रुपये इतकी असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी गांजाची खेप अंधेरी परिसरात ठेवायचे आणि तिथून मुंबईतील विविध भागात विकायचे. यामध्ये दोघी महिलांचा समावेश आहे. एक मूकबधिर व्यक्ती हे गोदाम चालवत होती. तर महिला गांजाच्या पुड्या तयार करुन बाजारात पाठवत असत. पोलिसांनी त्यांच्याकडून 23 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत 2 लाख 30 हजार इतकी आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून, दोन्ही महिलांना समन्स बजावण्यात आले आहे. अशरफ सय्यद (30 वर्ष), महेश शांतीलाल बिंद (33 वर्ष) (मूकबधिर) आणि मोबीन मेहबूब सय्यद (25 वर्ष) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केली.

कसा अडकला जाळ्यात?

मुंबईतील गोकुळ धाम परिसरात एक व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सुरज राऊत यांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केली.

आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 ग्रॅम गांजा आढळला. यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली तेव्हा त्याने गांजा तस्कर आणि त्यांच्या ठिकाण्यांची माहिती दिली.

संबंधित बातम्या :

पुण्यात अमलीपदार्थाची विक्री करताना नायजेरियन नागरिकाला अटक; इतक्या लाखांचे कोकेन जप्त

ना डॉक्टरांची चिठ्ठी, ना औषधांची बिलं, औरंगाबादेत नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री, एकाला बेड्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.