मायलेकाने बापाला संपवलं, मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, बँक अधिकाऱ्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेला आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याचा खून झाला आहे. मुलगा आणि पत्नीने मिळून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मायलेकाने बापाला संपवलं, मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला, बँक अधिकाऱ्याच्या हत्येने मुंबईत खळबळ
बँक अधिकाऱ्याची पत्नी मुलाकडूनच हत्या
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 11:03 AM

मुंबई : बँक अधिकाऱ्याची हत्या (Bank Officer Murder) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे पत्नी आणि मुलानेच त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात (Mumbai Crime) ही घटना घडल्याची माहिती आहे. बँक अधिकाऱ्याचा गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक कलह सुरु होता. या वादातूनच पत्नी आणि मुलाने अधिकाऱ्याची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजता मायलेकाने मिळून बापाचा जीव घेतला. त्यानंतर त्यांचा मृतदेह थेट सातव्या मजल्यावरुन खाली टाकल्याचं समोर आलं आहे. वडिलांच्या हत्येला आत्महत्या भासवण्याचा दोघांचा प्रयत्न फसला. आंबोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिला आणि मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेला आंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका बँक अधिकाऱ्याचा खून झाला आहे. मुलगा आणि पत्नीने मिळून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मृतदेह सातव्या मजल्यावरुन फेकला

बँक अधिकाऱ्याचा गेल्या काही महिन्यांपासून पत्नी आणि मुलासोबत कौटुंबिक वाद सुरु होता. याच रागाच्या भरात शुक्रवारी पहाटे पाच वाजता मायलेकाने त्यांची हत्या केली. अंधेरी पश्चिमेला असलेल्या अधिकारी निवास इमारतीमध्ये पत्नी आणि मुलाने मिळून पतीची हत्या केली. त्यानंतर थेट सातव्या मजल्यावरुन त्यांचा मृतदेह खाली टाकला. आत्महत्येचा बनाव रचण्याचा मायलेकाचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी तो उधळून लावला.

घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी महिला आणि मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित बातम्या :

दुसऱ्या लग्नासाठी नवऱ्याने डॉ. सुवर्णा वाजेंचा काटा काढला? डिलीट करण्यासारखं चॅटिंगमध्ये काय?

राम तेरी गंगा मैली, आधी प्रेम नंतर लोच्या- मग एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा का काढला काटा?

अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं, तरुणाकडून मेव्हण्याची हत्या

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.