Rajat Bedi | ‘जानी दुश्मन’ फेम अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक, प्रकृती गंभीर

जखमी राजेश रामसिंग दूत यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले, “त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, कारण त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ते आयसीयूमध्ये असून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांना तातडीने रक्ताची गरज आहे. ”

Rajat Bedi | 'जानी दुश्मन' फेम अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक, प्रकृती गंभीर
Rajat Bedi
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 11:13 AM

मुंबई : अभिनेता रजत बेदीच्या (Rajat Bedi) कारने धडक दिल्यामुळे मुंबईच्या डी एन नगर परिसरात राहणारी 39 वर्षीय व्यक्ती जखमी झाली आहे. सोमवारी कामावरुन परत येत असताना रजतच्या गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली होती. रजत बेदीनेच त्याला कूपर रुग्णालयात दाखल केलं आणि मदत करण्याचं आश्वासनही दिलं, अशी माहिती जखमी व्यक्तीच्या कुटुंबाने दिली आहे. जखमी राजेश रामसिंग दूत यांची प्रकृती गंभीर आहे.

डी एन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी सांगितले, की अभिनेता रजत बेदीविरोधात आयपीसी कलम 279 आणि 338, तसंच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कुर्डे म्हणाले की, कार स्वतः रजत बेदी चालवत होता. रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला रजतच्या गाडीने उडवलं. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पादचाऱ्याच्या डोक्याला दुखापत

जखमी राजेश रामसिंग दूत यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले, “त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, कारण त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. ते आयसीयूमध्ये असून ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांना तातडीने रक्ताची गरज आहे. ”

राजेशची पत्नी बबिता दुत म्हणाली, “माझे पती कामावरून परतत असताना संध्याकाळी 6.30 वाजता अंधेरी वेस्ट लिंक रोडवर शीतला देवी मंदिराजवळ ही घटना घडली. अभिनेता रजत बेदी एमएच 02 सीडी 4809 ही आपली कार चालवत होता, त्याने माझ्या पतीला रस्ता ओलांडत असताना धडक दिली. तो खाली पडला, त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे. माझ्या पतीला काही झाल्यास रजत बेदी जबाबदार असेल, त्याला अटक करा” अशी मागणी बबिता यांनी केली आहे.

पोलीस हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत रजत बेदी निघून गेला होता, त्यानंतर तो परतला नाही. डीएन नगर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं आहे.

कोण आहे रजत बेदी?

अभिनेता रजत बेदीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. इंटरनॅशनल खिलाडी, जोडी नंबर वन, जानी दुश्मन, कोई मिल गया, अक्सर, पार्टनर यासारख्या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिला पोलिसाचा अपघात

दुसरीकडे, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलडाण्यातून समोर आली आहे. 45 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी गीता सुभाष बामंदे सोमवारी पहाटेच्या सुमारास फेरी मारायला गेल्या होत्या. चिखली रोडवर जात असतान विद्युत वितरण कार्यालयासमोर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गीता बामंदे यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

मॉर्निंग वॉकला जाताना ट्रकची धडक, महिला पोलिसाचा जागीच मृत्यू

CCTV | म्हैस उधळून दुचाकीला धडकली, पुण्यात दाम्पत्य जखमी, तिघांना अटक

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.