मुंबईतील महाडिक मायलेक आत्महत्या प्रकरण, पितापुत्राला अटक, सुसाईड नोटमुळे गूढ उकललं
कुर्ल्याला राहणाऱ्या विवाहितेने माहेरी येऊन टोकाचं पाऊल उचललं होतं. महाडिक मायलेक बुधवारपासून मुंबईतील कुर्ला भागातून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी नोंदवली होती. त्यानंतर दोघांचा शोध घेतला जात होता, मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता.
मुंबई : मुंबईतील माय-लेकाच्या आत्महत्येप्रकरणी (Mother Son Suicide) दोघा जवळच्या नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रुती महाडिकचे चुलत दीर सचिन महाडिक आणि चुलत सासरे किशोर महाडिक यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्रुती महाडिकला लेकासह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप महाडिक पितापुत्रावर आहे. घरगुती कारणावरुन दोघा जणांनी छळ केल्याचा आरोप श्रुतीने सुसाईड नोटमध्ये केला होता. चेंबुरमधील अल्टा विस्टा इमारतीच्या जवळ असलेल्या नाल्यातील चिखल गाळात रुतलेला मायलेकराचा मृतदेह शुक्रवारी सापडला होता. श्रुतीने साडेतीन वर्षांच्या मुलगा राजवीरला छातीशी कवटाळून इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली होती.
काय आहे प्रकरण?
कुर्ल्याला राहणाऱ्या विवाहितेने माहेरी येऊन टोकाचं पाऊल उचललं होतं. महाडिक मायलेक बुधवारपासून मुंबईतील कुर्ला भागातून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी नोंदवली होती. त्यानंतर दोघांचा शोध घेतला जात होता, मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतरही त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर चेंबुरमधील अल्टा विस्टा इमारतीच्या जवळ असलेल्या नाल्यातून दोन सेकंद उडालेल्या पाण्याने गूढ उकललं होतं. इमारतीतून उडी मारुन श्रुतीने आयुष्य संपवल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दोघांचे मृतदेह चिखल गाळात रुतलेल्या अवस्थेत सापडले होते.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
IIT Bombay तील विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलमध्ये आयुष्याची अखेर, सुसाईड नोटमध्ये कारण उघड