शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, राजस्थानमधून आरोपीला अटक

20 ऑक्टोबरच्या रात्री शिवसेना आमदाराच्या मोबाईलवर एक संदेश आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता. तक्रारदार आमदाराने प्रतिसाद देताच पुढे दोघांमध्ये संभाषण सुरु झाले.

शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न, राजस्थानमधून आरोपीला अटक
शिवसेना आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्या प्रकरणी आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 9:01 AM

मुंबई : शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राजस्थानमधून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मौसमदीन मेव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या काही काळात सेक्सटॉर्शन किंवा हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार शिवसेना आमदार हे मुंबईतून सलग दोन वेळा विधानसभा आमदार आहेत. त्यांना 20 ऑक्टोबरच्या रात्री मोबाईलवर एक संदेश आला होता. हा संदेश मौसमदीन नावाच्या व्यक्तीने एक महिला बनून पाठवला होता. तक्रारदार आमदाराने प्रतिसाद देताच पुढे दोघांमध्ये संभाषण सुरु झाले.

आमदाराला महिलेचा व्हिडीओ कॉल

चॅटद्वारे या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. त्यानुसार आमदाराने मदत करण्याचे आश्वासन दिले. काही वेळाने आमदाराला एका महिलेचा व्हिडीओ कॉल केला. महिलेने सुमारे 15 सेकंद आमदारांशी बोलून मदतीबाबत चर्चा केली.

आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला

फोन कट होताच आमदाराच्या मोबाईलवर एक व्हिडीओ पाठवण्यात आला होता. आरोपींनी आमदाराचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करत त्यांना अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी आमदाराने मुंबईत पोलिसांत तक्रार दिली.

राजस्थानात आरोपी ताब्यात

त्यानंतर आरोपीचा राजस्थानातील भरतपूर येथे शोध लागला. भरतपूर येथील सिकारी पोलिस ठाण्याच्या पथकाने आरोपीला त्याच्या गावातून पकडले. लवकरच या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत अभिनेत्याची पत्नी हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत, बड्या उद्योगपतींकडून कोट्यवधी उकळले

महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ शूट करुन धमकी, सांगलीत पोलिसावर गुन्हा

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.