दादा मला एक ‘पल्सर’ आण, एकुलत्या एक बहिणीची इच्छा, भावाचा बाईक चोरीचा सपाटा

आरे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक झालेल्या पहिल्या आरोपीचे नाव अलंकार गुडेकर असून त्याचे वय 23 वर्षे आहे, दुसऱ्या आरोपीचे नाव कृष्णा शुक्ला आहे, त्याचे वय 22 वर्षे आहे, तर तिसऱ्याचे नाव शिब्बू आदक असून त्याचे वय 20 वर्षे आहे

दादा मला एक 'पल्सर' आण, एकुलत्या एक बहिणीची इच्छा, भावाचा बाईक चोरीचा सपाटा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 3:09 PM

मुंबई : गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, हे बालगीत तुम्हा-आम्हा सर्वांना चांगलंच परिचित आहे. दादाकडे वहिनी आणण्याची गळ घालणारी निरागस बहीण एकीकडे, तर दुसरीकडे बाईकचा हट्ट धरणारी ताई. आपल्या एकुलत्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भावाने चक्क पल्सर आणि डीओ बाईक चोरल्याचा प्रकार (Bike Theft) समोर आला आहे. ही घटना घडली आहे मायानगरी मुंबईत (Mumbai Crime). आरे पोलिसांनी (Aarey Police) बाईक चोरी प्रकरणातील तीन चोरट्यांना अटक केली आहे. त्यापैकी एकाने आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाईक चोरल्याचा दावा केला आहे. दुसऱ्या आरोपीची दुचाकी दोन वर्षांपूर्वी चोरीला गेली होती, त्यामुळे त्याने दुसऱ्याची दुचाकी चोरण्यास सुरुवात केली, आणि तिसरा चोर प्रेयसीला फिरवण्यासाठी दुचाकी चोरायचा. बाईकशिवाय पोलिसांनी या चोरट्यांकडून 3 सायकलीही जप्त केल्या आहेत.

कोण आहेत हे चोरटे?

आरे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक झालेल्या पहिल्या आरोपीचे नाव अलंकार गुडेकर असून त्याचे वय 23 वर्षे आहे, दुसऱ्या आरोपीचे नाव कृष्णा शुक्ला आहे, त्याचे वय 22 वर्षे आहे, तर तिसऱ्याचे नाव शिब्बू आदक असून त्याचे वय 20 वर्षे आहे. म्हणजे तिघेही जेमतेम 20 ते 23 वर्ष वयोगटातील आहेत.

बहिणीला भावाच्या चोरटेपणाचा पत्ताच नाही

पोलिसांनी सांगितले की, आरोपी अलंकार गुडेकरच्या एकुलत्या एक बहिणीला पल्सर आणि होंडा डीओ बाईक्स आवडतात, त्यामुळे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो बहिणीला पल्सर आणि डीओ बाइक देत असे, मात्र तो चोरीची दुचाकी चालवण्यासाठी देतो, हे त्याच्या बहिणीला माहिती नसल्याचा दावा केला जात आहे.

सूड उगवण्यासाठी दुसऱ्याची बाईक चोरी

दुसऱ्या आरोपीचे नाव कृष्णा शुक्ला याची दुचाकी दोन वर्षांपूर्वी चोरीला गेली होती, त्यामुळे त्याने दुसऱ्याची दुचाकी चोरण्यास सुरुवात केली. स्वतःसोबत जे घडलं, त्याचा सूड भलत्याकडून उगवण्याच्या नादात तोही चोरीच्या मार्गाला लागला.

हे आरोपी मुंबई आणि ठाण्यातील विविध भागांतून दुचाकी चोरायचे, दुचाकी चोरींबरोबरच दरोड्याचे सहा ते सात गुन्हेही मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. सध्या आरे पोलीस आरोपीला अटक करुन आता पुढील कारवाई करत आहेत.

संबंधित बातम्या :

फॅशन डिझायनरने विणलं बाईक चोरीचं जाळं, चार दुचाकींची ऑनलाईन विक्री, एका मेसेजमुळे भांडाफोड

यूट्यूबवरून प्रशिक्षण घेत चोरी, दिंडोशी पोलिसांना टीप लागताच खेळ संपला; दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या थेट मुसक्या आवळल्या

Bike Theft | बायकोच्या हौसेसाठी महागड्या बाईक्सची चोरी, कल्याणचा चोरटा जेरबंद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.