मुंबई-वाराणसी रेल्वेतून मृतदेह गायब, बारा तासांनी 200 किमी दूर मध्य प्रदेशात सापडला

गार्डच्या कम्पार्टमेंटमध्ये शवपेटीत ठेवलेला मृतदेह गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तब्बल 12 तासांच्या कालावधीनंतर 200 किमी दूर मध्य प्रदेशातील स्टेशनजवळ मृतदेह सापडला.

मुंबई-वाराणसी रेल्वेतून मृतदेह गायब, बारा तासांनी 200 किमी दूर मध्य प्रदेशात सापडला
रेल्वेतून मृतदेह गायब झाल्याची घटना घडली होती
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 12:15 PM

मुंबई : मुंबई-वाराणसी विशेष रेल्वेमधील मृतदेह गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र बारा तासांनी हा मृतदेह मध्य प्रदेशातील स्टेशनजवळ सापडल्याची माहिती आहे. गार्डच्या कम्पार्टमेंटमधून मृतदेह गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. मृतदेह मुंबईहून प्रयागराजला नेला जात असताना हा प्रकार घडला.

गार्डच्या कम्पार्टमेंटमध्ये शवपेटीत ठेवलेला मृतदेह गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तब्बल 12 तासांच्या कालावधीनंतर 200 किमी दूर मध्य प्रदेशातील स्टेशनजवळ मृतदेह सापडला.

काय आहे प्रकरण?

लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन गाडी नंबर 2117 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसीतून मृतदेह नेण्यासाठी बुकिंग करण्यात आले होते. मात्र गार्डच्या कम्पार्टमेंटमधून अचानक डेड बॉडी गायब झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं. त्यानंतर जीआरपी आणि आरपीएफ यांना सांगण्यात आलं.

शोधाशोध केल्यानंतर संबंधित मृतदेह मध्य प्रदेशातील मेहर रेल्वे स्टेशनवर असल्याचं बारा तासांनी जीआरपीला माहित झालं. त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाला हा मृतदेह सुपूर्द करण्यात आला. नेमकं काय झालं, याविषयी पुढचा तपास रेल्वे करत आहे.

सुटकेसमध्ये मृतदेह

याआधी, वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या महिलेची हत्या करुन, मुंडकं धडापासून वेगळं करून तो मृतदेह सुटकेसमध्ये भरुन समुद्रात फेकलेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. वसईच्या भुईगाव समुद्र किनारी 26 जुलै रोजी दुपारी हा मृतदेह मिळाला होता. सुटकेसमध्ये मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून मृतदेहाच्या अंगात ड्रेस घातलेला होता.

वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह

दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या 30 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना 11 जुलैला उघडकीस आली होती. वसईच्या किल्ला बंदर समुद्र किनाऱ्यावर ममता पटेल हिचा मृतदेह सापडला होता. ती चार दिवसांपासून बेपत्ता होती. ममता पटेल वसईच्या एव्हरशाईन परिसरात राहत होती. ती मूळ गुजरातमधील नवसारी येथील रहिवासी होती. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला होता.

संबंधित बातम्या :

वसई किनाऱ्यावर सुटकेसमधून दुर्गंध, उघडून पाहिलं तर धडापासून वेगळा असलेला महिलेचा मृतदेह

आधी विवाहितेचा मृतदेह, आता वसईतील त्याच बीचवर पुरुषही मृतावस्थेत, हातावर नाव गोंदवलेलं

मॉर्निंग वॉकहून परतलीच नाही, वसईतील बीचवर नवविवाहितेचा मृतदेह आढळला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.