ब्रेकअपनंतरही तिला लग्न करायचं होतं, पण त्याच्या मनात…. मुंबईतील 28 वर्षीय तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं

24 जानेवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास कॅरल तिच्या स्कूटीवरुन बॉयफ्रेण्ड झिकोला भेटण्यासाठी निघाली. झिकोचा साथीदार देवेंद्रन विरार फाटा येथे त्यांना भेटला. तिघांनी 25 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.14 वाजता खानिवडे टोल प्लाझा ओलांडला.

ब्रेकअपनंतरही तिला लग्न करायचं होतं, पण त्याच्या मनात.... मुंबईतील 28 वर्षीय तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं
आरोपी झिको मिस्किटा आणि मयत कॅरल मिस्किटा - फोटो - फेसबुक
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 2:45 PM

मुंबई : मुंबईतील विले पार्ले भागात राहणाऱ्या 28 वर्षीय कॅरल मिस्किटा (CAROL MISQUITTA) हिच्या हत्या प्रकरणी 27 वर्षीय प्रियकर झिको मिस्किटा याला अटक करण्यात आली आहे. झिकोने केलेला गुन्हा पूर्वनियोजित होता. तिला भेटायला जात असताना त्याच्यासोबत चाकू असल्याने त्याने हत्येची (Mumbai Murder Case) योजना आधीच आखल्याचं स्पष्ट होतं, अशी माहिती या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त मिड-डेने दिलं आहे. 25 जानेवारीच्या पहाटे झिको आणि त्याचा साथीदार कुमार बाबू देवेंद्रन यांनी कॅरोलची शरीरावर असंख्य वेळा वार करुन हत्या केल्याचा आरोप आहे. झिकोचे एका मुलीशी लग्न होणार होते, मात्र त्याच्यासोबत नुकतंच ब्रेक अप झालेली कॅरल याला विरोध करत होती, असे एका अधिकाऱ्याने गुन्ह्याचा हेतू स्पष्ट करताना सांगितले. तपास पथकाने मिड-डेला सांगितले की कॅरलचे डोके तिच्या शरीराला फक्त एका स्नायूच्या पातळ थराने जोडलेले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिची घशातील नलिकाही धारदार शस्त्राने कापण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?

24 जानेवारीच्या रात्री कॅरल विले पार्ल्यातील घरातून प्रियकराला भेटण्यासाठी बाहेर गेली, त्यानंतर बेपत्ता झाली होती. 3 फेब्रुवारीला तिचा मृतदेह मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात आढळला. बीपीओमध्ये काम करणारी कॅरल आपल्या 56 वर्षीय आईसोबत राहत होती. 2011 पासून आरोपी झिको मिस्किटासोबत तिचे प्रेमसंबंध होते. आरोपी तिच्यापेक्षा वर्षाने लहान आहे.

24 जानेवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास कॅरल तिच्या स्कूटीवरुन बॉयफ्रेण्ड झिकोला भेटण्यासाठी निघाली. झिकोचा साथीदार देवेंद्रन विरार फाटा येथे त्यांना भेटला. तिघांनी 25 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.14 वाजता खानिवडे टोल प्लाझा ओलांडला. देवेंद्रन त्याच्या मोटरसायकलवर एकटाच होता, तर झिको कॅरलच्या स्कूटरवरून जात होता. मात्र ती मागे बसली होती. त्यांचे शेवटचे लोकेशन टोल प्लाझाजवळ सापडले, असे तपासाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

वाघोबा घाटात दगडावर बसून गप्पा

चौकशीदरम्यान आरोपींनी पालघर पोलिसांना सांगितले की, त्यांनी केळवा समुद्र किनारी जाण्याचा बेत आखला होता, मात्र मध्येच त्यांनी विचार बदलला आणि तिघे वाघोबा घाटाकडे निघाले. “वाघोबा घाटात आल्यावर तिघं जण एका मोठ्या दगडावर बसले. कॅरलला झिकोशी लग्न करायचे होते, पण त्याने तिचा काटा काढून टाकण्याची योजना आखली होती. यावेळी दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरुन जोरदार वाद झाला. त्यावेळी झिकोने आधी तिचा गळा दाबला आणि नंतर तिला घाटातून खाली ढकलले, मात्र ती दगडांमध्ये अडकली.

चाकू छातीत अडकला

झिकोने कॅरलचा चेहरा दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती श्वास घेण्याासाठी धडपडत होती. तिला ठार मारताना झिको ‘ही मरत का नाहीये’ असं सारखं पुटपुटत होता. त्यानंतर देवेंद्रने चाकू बाहेर काढला आणि तिच्या शरीरावर अनेक वेळा वार केले, असा दावा झिकोने केला. “तिच्या छातीवर चाकूने वार करण्यात आले; चाकू बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना हँडल तुटले. मारेकऱ्यांनी त्याच भागात चाकूचे हँडल फेकले” असे पोलिसांनी सांगितले.

तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोन्ही मारेकरी वेगवेगळ्या दुचाकींवरून निघून गेले. “मुंबई-अहमदाबाद हायवेवर पोहोचल्यावर, झिकोने कॅरलची स्कूटी उभी केली आणि देवेंद्रनच्या बाईकवरून विलेपार्लेकडे निघाले.” मारेकरी तिचा मोबाईल आणि लॅपटॉपही विलेपार्ले येथे घेऊन गेले होते. “झिकोने डेटा नष्ट करण्यासाठी मुंबईतील एका व्यक्तीला या इलेक्ट्रॉनिक वस्तू दिल्या होत्या. पण मीडियामध्ये बातमी पसरल्यानंतर त्या व्यक्तीनेच पालघर पोलिसांकडे जाऊन ही गॅजेट्स सुपूर्द केली” असेही पोलिसांनी सांगितले.

असा लागला शोध

कॅरल घरी परतली नाही तेव्हा तिच्या आईने दुसऱ्या दिवशी सकाळी सांताक्रूझ पोलिसांशी संपर्क साधला. सांताक्रूझ पोलिसांनी तपास सुरू केला पण तिचा शोध लागत नव्हता. 10 दिवसांनंतर, 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास रस्त्याशेजारील झाडाजवळ लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिच्या कुजलेल्या मृतदेहाचा उग्र वास आला आणि त्याने पालघर पोलिसांना याविषयी माहिती दिली.

संबंधित बातम्या :

एकल महिलेला लग्नाचं आमिष, गर्भवती झाल्यावर जीवे मारण्याची धमकी, औरंगाबादचा वर्दीतला हा नराधम कोण?

मूकबधीर तरुणाचा गोदामाला पहारा, महिलांकडून ने-आण, मुंबईत गांजा तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश

ढगात आहे आपण, खालनं किती बी दगडं मारा, ‘थेरगाव क्वीन’ची मस्ती उतरेना, पिंपरी पोलिसांना व्हिडीओतून चॅलेंज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.