ATM Cash Theft | एटीएम कॅश व्हॅनसह ड्रायव्हर पसार, नवी मुंबईत 82 लाखांची लूट
एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघताना गाडीत 2 कोटी रुपयांची रोकड होती, तर जेव्हा चालक गाडी घेऊन फरार झाला, तेव्हा गाडीत 82 लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे.
नवी मुंबई : एटीएम सेंटरमध्ये (ATM Center) पैसे भरणारी कॅश व्हॅन घेऊन ड्रायव्हर पसार झाला. नवी मुंबईमध्ये ही धक्कादायक घटना (Navi Mumbai Crime) उघडकीस आली आहे. कारसह चालक परागंदा झाला, त्यावेळी गाडीत 82 लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. महिंद्रा बोलेरो गाडी घेऊन चालक, सुरक्षारक्षक आणि एटीएममध्ये पैसे टाकणारी व्यक्ती उरण परिसरात पैसे भरुन बामनडोंगरीला निघाली होती. तिथल्या सर्व एटीएम सेंटरमध्ये पैसे टाकण्यासाठी सुरक्षारक्षक आणि अन्य व्यक्ती गेले असताना चालकाने गाडी घेऊन पळ (ATM Cash Theft) काढला.
एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघताना गाडीत 2 कोटी रुपयांची रोकड होती, तर जेव्हा चालक गाडी घेऊन फरार झाला, तेव्हा गाडीत 82 लाख रुपये असल्याचा दावा केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
एटीएम सेंटरमध्ये भरण्यासाठी असलेले पैसे घेऊन गाडीसकट ड्रायव्हर पसार झाल्याचा प्रकार नवी मुंबईमध्ये उघडकीस आला आहे. 82 लाख रुपयांची रोकड चालकाने चोरल्याचा दावा केला जात आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आलं.
महिंद्रा बोलेरो गाडी घेऊन चालक, सुरक्षारक्षक आणि एटीएममध्ये पैसे टाकणारी व्यक्ती नवी मुंबईतील उरण परिसरात पैसे भरुन बामनडोंगरी भागाकडे निघाली होती. तिथल्या सर्व एटीएम सेंटरमध्ये पैसे टाकण्यासाठी सुरक्षारक्षक आणि अन्य व्यक्ती गेले असताना चालकाने संधी साधून गाडीसह पळ काढला.
गाडी पारसिकजवळ आढळली, चालक पसार
सुरक्षारक्षकांनी नवी मुंबईतील एनआरआय पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गाडीचा शोध घेतला, तेव्हा ही गाडी बेलापूर येथे पारसिक येथे आढळून आली आहे. मात्र चालक अद्यापही पैशांसह फरार आहे.
विशेष म्हणजे या कंपनीने चालकाचं साधं आधार कार्डही घेतलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांना चोराला पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईच्या मालवणी भागात घरफोडी करून पळणारा चोरटा CCTVमध्ये कैद
Pune CCTV | मंदिर एकच, चोरी चौथ्यांदा, पुण्यात सिंहगड रोडवरील देवळात दानपेटी फोडली