Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह लिखाण, नवी मुंबईत भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक
संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी माजी नगरसेविका आहेत.
नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Uddhav Thackeray) यांच्याविषयी ट्वीट केल्याबद्दल भाजप पदाधिकारी जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांच्यावरील कारवाईचा प्रकार ताजा असतानाच आणखी एक अटक झाली आहे. ठाकरेंविषयी लेखनाबद्दल संदीप म्हात्रे (Sandeep Mhatre) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी संदीप म्हात्रेंना अटक केली. म्हात्रेंनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसैनिकांनी पोलिात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी म्हात्रेंवर कारवाई केली.
कोण आहेत संदीप म्हात्रे?
संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी माजी नगरसेविका आहेत.
मिसेस ठाकरेंविषयी आक्षेपार्ह लेखन
जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर संघटक उमेश वाघ यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेन गजारिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर ट्विट करून त्याने ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वाघ यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
काय केले होते ट्विट
भाजपच्या जितेन गजरिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ‘मराठी राबडीदेवी’ (#MarathiRabriDevi) म्हटले होते. यामुळेच वाद निर्माण झाला होता, त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पण त्याची चौकशी केल्यानंतर काही वेळाने त्याला सोडण्यात आले. जितेन गाजरीया यांना ताब्यात घेतल्यानंतर गजारियांच्या वकिलाने गजारिया यांच्या ट्विटचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे, म्हणून ट्विट करता कामा नये, असा कायदा नाही. हे ट्विट अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायद्याच्या चौकटीत राहून केले आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या :
रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपच्या जितेन गजरियावर पुण्यात गुन्हा दाखल