अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप
प्रियकराने मुलीचा अश्लील व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवण्याचा धाक दाखवून एकूण तिघा जणांनी गँगरेप केल्याचं समोर आलं आहे. आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर : सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Minor Girl Gang Rape) केला जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मुलीचा अश्लील व्हिडीओ (Obscene Video) तयार केला होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती दाखवून तिघा जणांकडून तिच्यावर वारंवार अत्याचार केला जात असल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यातील (Palghar) सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील मुरबे येथील ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे पीडित अल्पवयीन मुलीच्या प्रियकराचा आरोपींमध्ये समावेश आहे. सहा महिन्यांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या स्मृती जाग्या झाल्या.
काय आहे प्रकरण?
प्रियकराने मुलीचा अश्लील व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवण्याचा धाक दाखवून एकूण तिघा जणांनी गँगरेप केल्याचं समोर आलं आहे. आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा महिन्यांपासून सामूहिक बलात्कार
प्रियकराने काढलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती पीडितेला दाखवली जात होती. प्रियकरासह एकूण तिघा जणांकडून अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून सामूहिक बलात्कार केला जात होता. पालघर मधील सातपाटी पोलीस ठाणे हद्दीतील मुरबे येथे हा प्रकार घडला.
तिघाही आरोपींना अटक
सातपाटी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कारासह पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना सातपाटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींना पालघर न्यायालयात हजर केले असता 10 फेब्रुवारीपर्यंत तिघाही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप
धमकी देत रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 जण अटकेत, तिघे फरार