Palghar | तीन आठवड्यांपासून बेपत्ता, पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा कुजलेला मृतदेह सापडला

पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. तीन मार्चपासून 21 वर्षीय चेतन खंदारे बेपत्ता असल्याची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात दाखल होती.

Palghar | तीन आठवड्यांपासून बेपत्ता, पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा कुजलेला मृतदेह सापडला
बेपत्ता विद्यार्थी विहिरीत मृतावस्थेत आढळलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 2:03 PM

मोहम्मद हुसैन, टीव्ही9 मराठी, पालघर : बेपत्ता असलेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा (Engineering Student) मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थ्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय चेतन खंदारे या विद्यार्थ्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. पालघर – बोईसर रस्त्यावरील (Palghar Crime) उमरोळी येथील मोहरे ब्रिजजवळ विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. चेतनची हत्या (Murder) झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तीन आठवड्यांपासून बेपत्ता

पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. तीन मार्चपासून 21 वर्षीय चेतन खंदारे बेपत्ता असल्याची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात दाखल होती. चेतन पालघरमधील सेंट जॉन्स कॉलेजमधील सिव्हिल इंजिनिरंगमध्ये शेवटच्या वर्षातील विद्यार्थी होता.

मोहरे ब्रिजजवळ कुजलेला मृतदेह

कुजलेल्या अवस्थेतील चेतनचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ माजली आहे. पालघर – बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिजजवळ त्याचा मृतदेह आढळला. पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

चेतनची हत्या झाल्याचा आरोपी कुटुंबियांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र त्याने आत्महत्या केली, त्याच्यासोबत घातपात झाला, की त्याचा अपघात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

संबंधित बातम्या :

London | लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या, 22 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक

आमच्या घराला आग लावलेय, तरुणाचा मित्राला फोन; नवदाम्पत्यासह आठ जणांचे कोळसा झालेले मृतदेह सापडले

 बारावीची परीक्षा द्यायला जेलबाहेर आला आणि रोहन नाईकचा खून केला!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.