‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, निर्मात्याच्या भावाला अटक

मुंबई पोलिसांनी 35 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा चित्रपट निर्मात्याचा भाऊ असल्याची माहिती आहे. अयोग्य पद्धतीने स्पर्श करणे आणि शरीरसुखाची मागणी करणे, या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, निर्मात्याच्या भावाला अटक
सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अभिनेत्रीची तक्रार
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 12:20 PM

मुंबई : चित्रपट-मालिकेत संधी देण्याच्या आमिषाने नवोदित अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका निर्मात्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील ही अभिनेत्री असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई पोलिसांनी 35 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा मालिका-चित्रपट निर्मात्याचा भाऊ असल्याची माहिती आहे. अयोग्य पद्धतीने स्पर्श करणे आणि शरीरसुखाची मागणी करणे, या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

स्ट्रगलिंग अभिनेत्रीसोबत गैरवर्तन

चित्रपट-मालिकेत अभिनयाची संधी देण्याच्या आमिषाने स्ट्रगलिंग अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. आरोपीचे नाव स्वप्नील लोखंडे असल्याची माहिती आहे. त्याच्यावर भादंवि कलम 354 च्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अभिनेत्री क्राईम पेट्रोलसोबतच काही मराठी मालिकांमध्येही काम केलं आहे.

निर्मात्याच्या भावाकडून धमक्या, पीडितेचा आरोप

आपण जेव्हा आरोपी स्वप्नीलच्या गैरवर्तनाला विरोध करायचो, तेव्हा तो भयंकर परिणामांना सामोरे जावं लागेल, अशी धमकी देत आपल्या घाबरवायचा, असा दावा पीडित अभिनेत्रीने केला आहे. तिच्या तक्रारीनुसार आरे पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्रीचे सहकलाकारांवर आरोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मलिकेत ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल (Annapurna Vitthal) यांनी मालिकेचे दिग्दर्शक आणि मालिकेतील सहकलाकारांवर अनेक आरोप करत, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या या आरोपांनंतर अभिनेता सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी ‘अन्नपूर्णा यांनी मालिका सोडली ही त्यांची इच्छा होती. त्यांनी मालिकेतून काढता पाय घेतल्याने आम्हाला वाईट वाटले होते. पण आता त्या जे काही बोलतायत ते चुकीचं आहे’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

संबंधित बातम्या :

‘रात्रीस खेळ चाले 3’ ला शेवंताचा रामराम, ‘या’ कारणामुळे सोडली मालिका, वाचा काय घडले?

‘त्यांनी मालिका सोडली वाईट आम्हाला वाटलं, पण असं…’, अन्नपूर्णा विठ्ठल यांच्या आरोपांवर सुनिल बर्वेंची प्रतिक्रिया

‘अमराठी म्हणून सहकलाकारांनी माझा छळ केला’, ‘शेवंता’नंतर आणखी एका प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीचा मोठा आरोप!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.