हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

उल्हासनगर स्थानकाला लागून असलेल्या स्काय वॉकवर पीडित अल्पवयीन मुलगी उभी होती. ती शिर्डीहून कल्याणला एका खासगी बसने आली होती. स्काय वॉकवर तिला तिचे दोन मित्र भेटले. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने हातोडा दाखवून तिच्या मित्रांना धमकावले

हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार
पुणे, मुंबई पाठोपाठ उल्हासनगरात भीषण घटना, रेल्वे स्थानक परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 1:47 PM

उल्हासनगर (ठाणे) : मुंबई, पुणे, अमरावतीनंतर ठाण्यातील उल्हासनगर भागातही बलात्काराची घटना समोर आली होती. शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगर स्थानकाला लागून असलेल्या स्काय वॉकवर पीडित अल्पवयीन मुलगी उभी होती. ती शिर्डीहून कल्याणला एका खासगी बसने आली होती. स्काय वॉकवर तिला तिचे दोन मित्र भेटले. त्यावेळी आरोपी तिथे आला. त्याने हातोडा दाखवून तिच्या मित्रांना धमकावले. त्यामुळे घाबरुन मित्र पळून गेले. त्यानंतर त्या तरुणाने तिला जबरदस्ती एका निर्जन स्थळी नेले. तिथे बेदम मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे.

बलात्कारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पोबारा केला. पीडित मुलीने आपल्या मित्रांना फोन करुन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. मित्रांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शादरुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला. पोलिसांनी या प्रकरणी नराधम आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला अटक केली आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे.

पिंपरीत शिक्षिकेवर बलात्कार

दुसरीकडे पिंपरीत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगत एका नराधमाने शिक्षिकेवर बलात्कार केला. संबंधित शिक्षिकेला पैशाची आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ओळखीने आरोपी विकास अवस्थी यांच्याकडे पैशाची मागणी केली. आरोपी विकास अवस्थीने दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून पीडित महिलेला घरी बोलावून त्यांच्याकडून दोन कोऱ्या चेकवर ,कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर पीडित महिलेला सॉफ्टड्रिंक देऊन दुष्कृत्य केले. तसेच पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून, ते सर्वांना दाखवून बदनामी करेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.

पुणे शहरात सहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

पुण्यात आठ दिवसांपूर्वी एका 13 वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे. विशेष म्हणजे या घटनेतही अत्याचार करणारा हा एक रिक्षाचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पीडितेला फुटपाथवरुन उचलून नेत अपहरण

पीडित सहा वर्षीय चिमुकली ही रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपली होती. आरोपीने तिला फुटपाथवरुन उचलून नेत तिचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपीने चिमुकलीवर बलात्कार केला. या संतापजनक प्रकाराची माहिती पीडितेच्या आई-वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच पीडितेला त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित व्हिडीओ  :

हेही वाचा :

वर्षभर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या घरात शिरुन कुटुंबियांनाही मारहाण, पुण्यातल्या नण्या वाघमारे गँगचं भयानक कृत्य

तरुणीसोबत आधी दोस्ती केली, नंतर नोकरीचं आमिष, कारमध्येच सामूहिक बलात्कार, पीडितेला हायवेवर फेकून दिलं

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.