VIDEO | फूटेज असूनही वडील खोट्या केसमध्ये तुरुंगात, दादाचा पत्ता नाही, बदलापूरच्या तरुणीचा ठाकरे सरकारकडे टाहो

ठाकरे सरकारकडे मदतीसाठी टाहो फोडत न्याय न मिळाल्यास आईसह आत्महत्या करण्याचा इशारा तृप्तीने दिला आहे. तृप्ती यादवचा व्हिडीओ महिला पत्रकाराने ट्विटरवर शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ठाणे पोलीस यांना टॅग करुन मदतीची विनवणी केली आहे.

VIDEO | फूटेज असूनही वडील खोट्या केसमध्ये तुरुंगात, दादाचा पत्ता नाही, बदलापूरच्या तरुणीचा ठाकरे सरकारकडे टाहो
बदलापूरच्या तरुणीची सरकारकडे याचना
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 11:09 AM

मुंबई : वडिलांना खोट्या केसमध्ये अडकवून तुरुंगात डांबलं आहे, काही जणांनी दादाच्या अंगावर तीन वेळा गाडी घातली होती, त्याचा आता पत्ता नाही, धाकट्या भावावरही त्यांनी वार केले, असा आरोप ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात राहणाऱ्या तृप्ती यादव नावाच्या तरुणीने केला आहे. ठाकरे सरकारकडे मदतीसाठी टाहो फोडत न्याय न मिळाल्यास आईसह आत्महत्या करण्याचा इशारा तृप्तीने दिला आहे. तृप्ती यादवचा व्हिडीओ महिला पत्रकाराने ट्विटरवर शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ठाणे पोलीस यांना टॅग करुन मदतीची विनवणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

“इतका त्रास दिला जात आहे, वडिलांना लॉकअपमध्ये टाकलं आहे, मोठ्या भावाचा पत्ता नाही, धाकट्या भावाला सांगत आहेत की दोघांना ताब्यात घेणार. त्यांच्यावरही 307 किंवा 326 अंतर्गत कारवाई व्हावी, आमच्याकडे पूर्ण फुटेज आहे. त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की आमची काही चूक आहे की नाही. माझे वडील किंवा मोठ्या भावाने काहीही केलेलं नाही. त्यांनी येता-येता माझ्या दादाला मारायला सुरुवात केली. माझ्या धाकट्या भावालाही मारलं. माझ्या धाकट्या भावाने सेल्फ डिफेन्समध्ये त्यांच्याच हत्याराने त्यांना मारलं, त्यानंतर त्यांनी त्याच्यावरही वार केले. मोठ्या भावाच्या अंगावर तीन वेळा गाडी चढवून ते फरार झाले.” असा आरोप तरुणीने व्हिडीओमध्ये केला आहे. मात्र ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्या नावाचा उल्लेख तिने केलेला नाही

तरुणीचे आरोप काय?

“आमच्यावर उलटी केस टाकली. बदलापूर गावचे पोलीस त्यांना पाठिंबा देत आहेत. मी जेव्हा एफआयआर घ्यायला गेले, तेव्हा मला म्हणाले त्यांच्यावरही 307 लावलाय. मी पाहिलं तर आमच्यावर 326 लावलाय, पूर्ण कुटुंबाला त्रास देत आहेत. माझी आई एकटी आहे घरी. माझ्या कुटुंबासोबत असं करत आहेत. उद्या काही झालं तर मी आणि माझी आई आत्महत्या करु, संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. पोलिसांकडे फूटेज असूनही आम्हाला सहकार्य करत नाहीत, त्रास देतात. आम्ही हा त्रास आणखी सहन करु शकत नाही. माझ्या बाबांना लॉकअपमध्ये टाकलंय. माझी शेवटची विनंती आहे सरकारकडे त्यांच्यावरही 307 लावा” असंही तिने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान,ही तक्रार पोलीस उप-आयुक्त परिमंडळ चार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर (प) यांना आवश्यक कारवाईसाठी कळवली आहे, अशी माहिती ठाणे शहर पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

शेतात जाणाऱ्या महिलेची दोन्ही पाय कापून हत्या, जोडव्यांच्या चोरीसाठी सशस्त्र हल्ला

नंदनवनमध्ये दारुच्या वादातून मित्राची हत्या, आरोपीने गुन्ह्याची दिली कबुली

मशिनमध्ये स्कार्फ अडकला, पुण्यात 21 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.