Bhiwandi Murder | मटण कापण्याच्या सुरीने पत्नीची हत्या, पतीची तलावात उडी, दाम्पत्यातील वादाचं कारण काय?

पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तलावात उडी मारुन आरोपी पतीने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी पाण्यात उड्या मारुन त्याला वाचवलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं.

Bhiwandi Murder | मटण कापण्याच्या सुरीने पत्नीची हत्या, पतीची तलावात उडी, दाम्पत्यातील वादाचं कारण काय?
पत्नीच्या हत्येनंतर पतीची तलावात उडी
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 9:52 AM

भिवंडी : पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने मटण कापण्याच्या सुऱ्याने पत्नीला संपवल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तलावात उडी मारुन आरोपी पतीने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी पाण्यात उड्या मारुन त्याला वाचवलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. आनंद वाघमारे असे पत्नीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय

आरोपी पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. यावरुन दोघांमध्ये अनेक वेळा खटकेही उडत होते. रविवारी पतीने रागाच्या भरात मटण कापण्याच्या सुऱ्याने पत्नीच्या पोटावर आणि गळ्यावर वार केले.

पत्नीच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीला गंभीर जखमी अवस्थेत घरातच सोडून पती बाहेर पडला. त्यानंतर त्याने घरापासून काही अंतरावरच असलेल्या वऱ्हाळ तलावात उडी मारली. पत्नीच्या हत्येनंतर आत्महत्या करण्याचा पतीचा डाव होता.

स्थानिकांनी आरोपी पतीला तलावातून वाचवलं

हा प्रकार पाहून तलाव परिसरात उपस्थित असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी पटापट पाण्यात उड्या मारल्या. आरोपी पतीला तलावातील पाण्यातून वाचवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला सुराही जप्त केला आहे.

अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला

दुसरीकडे, भिवंडीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह वेळीच रोखण्यात यश आलं आहे. हळदी समारंभ झाल्याचे लक्षात येताच अंगणवाडी सेविकेने चाईल्ड हेल्पलाईनवर तक्रार केल्याने महिला आणि बाल विकास विभागाने रविवारी होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवले.

संबंधित बातम्या :

भिवंडीत पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, 14 वर्षांची पीडिता गरोदर

पोटच्या गोळ्याला कुत्र्याच्या पिल्लाजवळ सोडलं, एक दिवसाच्या बाळासोबत रात्रभर काय काय घडलं?

जमिनीच्या वादातून तरुणाकडून भाला मारुन चुलत भावाची हत्या, हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.