आई किचनमध्ये, पाच भावंडं टीव्ही बघण्यात गुंग, पाण्याच्या बालदीत पडून भिवंडीत चिमुकल्याचा मृत्यू
कुटुंबातील सर्व सदस्य हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले असताना एक वर्षाचा चिमुकला खेळत खेळत बाथरुममध्ये गेला. बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बालदीत तो पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
भिवंडी : बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बालदीत पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याीच दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात देवनगर भागात एक वर्षीय चिमुरड्याचा करुण अंत झाला. ही घटना घडली त्यावेळी चिमुकल्याची आई स्वयंपाकघरात जेवण बनवत होती, तर इतर भावंडं टीव्ही बघत होती.
नेमकं काय घडलं?
कुटुंबातील सर्व सदस्य हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले असताना एक वर्षाचा चिमुकला खेळत खेळत बाथरुममध्ये गेला. बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बालदीत तो पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सहा भावंडांतील धाकटा
संबंधित कुटुंबात 6 भावंडं असून मयत चिमुरडा सर्वात लहान होता. घटनेच्या वेळी चिमुकल्याची आई किचनमध्ये जेवण तयार करत होती. तर इतर मुलं घरात हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती. त्यावेळी खेळता खेळता चिमुरडा बाथरुममध्ये गेला.
चिमुरड्याच्या मृत्यूने हळहळ
पाण्याने भरलेल्या बालदीत तो कसा पडला, हे अस्पष्ट आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होत आहे.
संबंधित बातम्या :
Nashik Suicide | आई मला माफ कर, सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या
CCTV | निवांतपणे चालत होता, अचानक सळी कोसळली, डोक्यात घुसली, पुढचं सगळंच सुन्न करणारं..
चारित्र्याच्या संशयातून पतीने काढला पत्नीचा काटा; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या