काळजाला हात घालणारी घटना, मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, वडिलांनाही अटॅक; घराचा आधारच गेला

मुलाने प्राण सोडल्याचं रिक्षात बसलेल्या त्या नरपथ जैन यांनी पहिले. मुलाला असं पडलेलं पाहून नरपथ यांना चक्कर आली आणि तेही खाली पडले.

काळजाला हात घालणारी घटना, मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, वडिलांनाही अटॅक; घराचा आधारच गेला
मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, वडिलांनाही आला अटॅकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 4:23 PM

विरार: मुंबईपासून हाकेच्या हाकेवर असलेल्या विरारमध्ये (virar) काळजाला हात घालणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. गरबा (garba) खेळत असताना मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात जात असतानाच त्याचा मृत्यू (death) झाला. मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनाही इतका मानसिक धक्का बसला की त्यांनीही जागीच प्राण सोडले. एकाचवेळी एकाच घरातील दोन कर्ते पुरुष गेले. त्यामुळे या कुटुंबावर प्रचंड शोककळा पसरली आहे. तसेच या दुर्देवी घटनेमुळे विरारमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटीतील अग्रवाल कॉमप्लेक्समधील एव्हरशाईन अव्हेन्यूमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. सोसायटीच्या आवारात मनिषकुमार नरपथ जैन (वय 35) हे गरबा खेळत होते. गरबा खेळत असतानाच मनिषकुमार यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तात्काळ रिक्षात टाकून विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी रिक्षात मनिषकुमार यांचे वडील नरपथ हरिश्चंद्र जैन (65) हे बसलेले होते.

ही रिक्षा संजीवनी हॉस्पिटलच्या मेडिकल जवळ येताच मनिषकुमार हे रिक्षातून खाली पडले. मुलाने प्राण सोडल्याचं रिक्षात बसलेल्या त्या नरपथ जैन यांनी पहिले. मुलाला असं पडलेलं पाहून नरपथ यांना चक्कर आली आणि तेही खाली पडले. त्यामुळे दोघांनाही तात्काळ दवाखान्यात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी या दोघा बापलेकांना तपासून दोघांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं.

हे सुद्धा वाचा

जैन कुटुंबातील बापलेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सोसायटीतील रहिवाशांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे जैन कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शून्य नंबरने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.