अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत गंभीर जखमी पादचाऱ्याचा मृत्यू, गुन्हा दाखल

जखमी राजेश रामसिंग दूत याची प्रकृती सुरुवातीपासूनच अत्यंत गंभीर होती. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. तो आयसीयूमध्ये  ऑक्सिजन सपोर्टवर होता. त्याला तातडीने रक्ताची गरज होती.

अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत गंभीर जखमी पादचाऱ्याचा मृत्यू, गुन्हा दाखल
Rajat Bedi
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 11:00 AM

मुंबई : अभिनेता रजत बेदीच्या (Rajat Bedi) कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या 39 वर्षीय राजेश रामसिंग दूत याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी कामावरुन परत येत असताना रजतच्या गाडीने मुंबईच्या डी एन नगर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली होती. रजत बेदीनेच त्याला कूपर रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी कलम 304A अन्वये निष्काळजीपणे एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी रजत बेदीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता रजत बेदीविरोधात सुरुवातीला कलम 279 आणि 338, तसंच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती डी एन नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दिली होती. कार स्वतः रजत बेदी चालवत होता. रस्ता क्रॉस करणाऱ्या व्यक्तीला रजतच्या गाडीने उडवलं, असं कुर्डेंनी सांगितलं होतं. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

डोक्याच्या दुखापतीमुळे गंभीर होती प्रकृती

जखमी राजेश रामसिंग दूत याची प्रकृती सुरुवातीपासूनच अत्यंत गंभीर होती. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. तो आयसीयूमध्ये  ऑक्सिजन सपोर्टवर होता. त्याला तातडीने रक्ताची गरज होती.

“माझे पती कामावरून परतत असताना सोमवारी संध्याकाळी 6.30 वाजता अंधेरी वेस्ट लिंक रोडवर शीतला देवी मंदिराजवळ ही घटना घडली. अभिनेता रजत बेदी एमएच 02 सीडी 4809 ही आपली कार चालवत होता, त्याने माझ्या पतीला रस्ता ओलांडत असताना धडक दिली. तो खाली पडला, त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दुखापत झाली आहे. माझ्या पतीला काही झाल्यास रजत बेदी जबाबदार असेल, त्याला अटक करा” अशी मागणी राजेशची पत्नी बबिता दुत यांनी यांनी केली होती.

रजत बेदीनेच जखमी अवस्थेत कूपर रुग्णालयात दाखल केलं होतं आणि मदत करण्याचं आश्वासनही कुटुंबीयांना दिलं होतं. मात्र पोलीस हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत रजत बेदी निघून गेला होता, त्यानंतर तो परतला नाही. डीएन नगर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं.

कोण आहे रजत बेदी?

अभिनेता रजत बेदीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. इंटरनॅशनल खिलाडी, जोडी नंबर वन, जानी दुश्मन, कोई मिल गया, अक्सर, पार्टनर यासारख्या सिनेमांमध्ये तो झळकला आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिला पोलिसाचा अपघात

दुसरीकडे, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलडाण्यातून समोर आली आहे. 45 वर्षीय महिला पोलीस कर्मचारी गीता सुभाष बामंदे सोमवारी पहाटेच्या सुमारास फेरी मारायला गेल्या होत्या. चिखली रोडवर जात असतान विद्युत वितरण कार्यालयासमोर ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गीता बामंदे यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

मॉर्निंग वॉकला जाताना ट्रकची धडक, महिला पोलिसाचा जागीच मृत्यू

Rajat Bedi | ‘जानी दुश्मन’ फेम अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक, प्रकृती गंभीर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.