Mira road News: मिरारोडमध्ये भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर जीवघेणा हल्ला! थोडक्यात बचावल्या

Mira Road Crime News : तीन दिवसांपूर्वीच शिवसैनिकांच्या कारवरही भायखळ्यात तलवारीनं हल्ला करण्यात आलेला होता.

Mira road News: मिरारोडमध्ये भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर जीवघेणा हल्ला! थोडक्यात बचावल्या
थोडक्यात बचावल्या...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 8:38 AM

मिरारोड : मिरारोडमध्ये (Mira road News) भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी असलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला (Attempt to Murder) करण्यात आला. य हल्ल्यामुळे मिरारोड भाजपात (Mira road BJP) एकच खळबळ माजलीय. रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात महिला पदाधिकारी सुल्ताना खान जखमी झाल्यात. त्यांच्या हाताला दुखापत झाली. सुल्ताना खान यांच्या गाडीवर रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी अचानक हल्ला चढवला. दोन अज्ञात इसमांनी मध्यरात्री त्यांच्यावर हल्ला केला आहे. यात सुलताना यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. रविवारी रात्री सुल्ताना ह्या त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त निघाल्या होत्या. एवढ्यात मिरारोड मधील नया नगर जवळ दुचाकी वरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी गाडीवर हल्ला केला. तसेच धारदार वस्तूने सुल्ताना यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने यात फक्त सुलताना यांच्या हाताला दुखापत झाली.

थोडक्यात बचावल्या

सुल्ताना खान यांना तात्काळ त्यांच्या पतीने मिरारोडच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथे त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आलं. त्या जबाब देण्याच्या स्थितीमध्ये नसल्याने रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस तक्रार देण्यात आलेली नव्हती.

4 जुलैच्या फेसबुक अकाउंट वरुन एका व्हिडिओमध्ये सुल्तान खान यांनी आपणाला मुंबईच्या पदाधिकारी कड़ून धमकी येत असल्याच सांगितलं होतं. त्यांचा पूर्वीचा व्हिडीओ कुणीतरी डिलीट केल्याचंही बोललं जातंय. ‘ना डरी हूँ… ना डरूँगी’ सुल्ताना खान यांनी आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा

का करण्यात आला हल्ला?

आता सुल्ताना खान यांच्यावर हल्ला कुणी केली, राजकीय आकसातून हा हल्ला करण्यात आला होता की या मागे आणखी वेगळं काही कारण आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, या हल्लाप्रकरणी सुल्ताना खान याचे पती समीर खान यांनी निषेध केलाय. या भ्याड हल्ल्याप्रकरणी त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम आता पोलिसांकडून राबवली जाते आहे. या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या सुल्ताना खान यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.रामलखन यादव यांनी दिली आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच शिवसैनिकांच्या कारवरही भायखळ्यात तलवारीनं हल्ला करण्यात आलेला होता. या हल्ल्यानंतरही एकच खळबळ माजली होती. सुदैवानं या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नव्हतं. मात्र अज्ञात हल्लेखोरांनी येऊन दोघा शिवसेनेच्या भायखळ्यातील कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला होता. ही घटना ताजी असतानाच मिरारोडमध्ये हल्ला तशाच प्रकारे हल्ला झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.