VIDEO | राज ठाकरेंना वॉचमननं ओळखलं नाही म्हणून मारहाण? काहींना अटक, नेमकं प्रकरण काय?
मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी मुंबईतील मढ परिसरात असलेल्या बंगल्यात जाऊन सुरक्षारक्षकाला मारहाण करून पैशांची मागणी करत होते. एवढंच नाही तर मारहाणीनंतर त्यांनी या घटनेचा व्हिडीओही व्हायरल केला.
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो ओळखत नसल्याबद्दल मराठी अभिनेत्रीने वॉचमनला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वॉचमनला मारहाण करणारी महिला मनसेची कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
मुंबईच्या मालवणी पोलिसांनी मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे, तर अभिनेत्रीला पोलिसांनी नोटीस दिली आहे.
काय आहे प्रकरण?
मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी मुंबईतील मढ परिसरात असलेल्या बंगल्यात जाऊन सुरक्षारक्षकाला मारहाण करून पैशांची मागणी करत होते. एवढंच नाही तर मारहाणीनंतर त्यांनी या घटनेचा व्हिडीओही व्हायरल केला.
या घटनेनंतर पीडित वॉचमन दयानंद गोड यांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भादंविच्या कलम 452,385,323,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली.
मनसे विभाग अध्यक्षांचं म्हणणं काय
चारकोप विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी सांगितले की, मराठी दिग्दर्शक, निर्माते आणि एक मराठी अभिनेत्री शूटिंगचे ठिकाण पाहण्यासाठी मढ़ येथील एका बंगल्यात गेले होते, तिथे सुरक्षा रक्षकाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा फोटो पाहून त्यांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्यानंतर अभिनेत्रीने सुरक्षारक्षकाला थप्पड लगावली, मात्र पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा चुकीचा असल्याचं साळवींचं म्हणणं आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
MNS | वाशी टोलनाक्यावर कर्मचाऱ्याला मनसेचा चोप, मराठीत न बोलल्याने कर्मचाऱ्याला मारहाण
अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप