Mumbai : आर्थर रोड जेलमध्ये खळबळ! नुपूर शर्मा प्रकरणातील आरोपीवरच कोठडीत प्राणघात हल्ला, गुन्हा दाखल

Arthur Road Jail News : ऑर्थर रोडमधल्या बराक नंबर 7 मध्ये हे कैदेत होते.

Mumbai : आर्थर रोड जेलमध्ये खळबळ! नुपूर शर्मा प्रकरणातील आरोपीवरच कोठडीत प्राणघात हल्ला, गुन्हा दाखल
आरोपीवर जेलमध्ये प्राणघातक हल्लाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 12:58 PM

मुंबई : नुपूर शर्मा वाद तुरुंगापर्यंत (Nupur Sharma Controversy) पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता तर उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील (Umesh Kolhe Murder)  आरोपीवर तुरुंगात हल्ला करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. पाच जणांनी मिळून आरोपीवर तुरुंगात हल्ला गेला आहे. त्यामुळे जेल प्रशासनातही खळबळ माजली आहे. उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीवर जेलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आता ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये (Mumbai Crime News) गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. एकाच बराकमध्ये असलेल्या आरोपींनी प्राणघातक हल्ला केली. पाच जणांनी मिळून आरोपी शाहरुख पठाणवर हल्ला केला आहे. आर्थर रोड तुरुंगात आरोपीवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता प्रशासनही सतर्क झालंय. जेल प्रशासनाने तात्काळ त्यांना बाजूला केलं आणि वेगळ्या बराकमध्ये हलवलंय.

ऑर्थर रोडमधल्या बराक नंबर 7 मध्ये हे कैदेत होते. कोणाला कोणत्या कारणावरून अटक झालीय याविषयी त्यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी शाहरुख पठाण याने नूपुर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात अटक झाल्याचं सांगितलं. यावेळी आरोपी सोबत असणाऱ्या कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया,अरविंद यादव, श्रावण आवण आणि संदीप जाधव यांनी पठाणवर हल्ला केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींना वेगळ्या बराकमध्ये हलवण्यात आलं आहे. तसंच याप्रकरणी जेल प्रशानाकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण?

उमेश कोल्हे हत्याप्रकरणी महाराष्ट्रात राजकीय पडसादही उमटले होते. उमेश कोल्हे यांची हत्या 21 जून रोही करण्यात आली होती. गळा चिरुन त्यांची हत्या कऱण्यात आलेली. त्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला काही जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं होतं. अखेर वादाच्या पार्श्वभूमीवर उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला होता. सध्या एनआयएकडूनच या प्रकरणाता तपास केला जातो आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रमाणेच आधी उदयपूरमध्ये एका टेलरची हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणाचा समान धागा या दोन्ही प्रकरणांत पाहायला मिळाला होती.

वादग्रस्त वक्तव्यामुळे नुपूर शर्मा यांच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. देशभर आंदोलनंही झाली होती. त्यानंतर नुपूर शर्मा यांनी जाहीर माफी मागावी, असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.