Car Accident | अक्सा बीचजवळ कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 6 जण जखमी
या अपघातात एकूण 6 जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : नागपुरातील (Nagpur) विचित्र अपघातानंतर आता मुंबईतून (Mumbai) अपघाताची बातमी समोर आली आहे. मुंबईत मालाडच्या अक्सा बीचजवळ (Aksa Beach) कारचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात एकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली असून अधिक तपास सुरु आहे.
कसा झाला अपघात?
मालाडच्या अक्सा किनाऱ्याजवळ काही जण वाढदिवसाच्या पार्टी करण्यासाठी आले होते. यावेळी कारचालकानं नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण 6 जण जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा पोलिसांनी पंचनामा केला असून या अपघातप्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत.
Mumbai | One person died, six injured after a car lost control at Malad’s Aksa Beach. The deceased and the injured came to the beach to hold birthday celebrations. Police have registered ADR, further investigation.
— ANI (@ANI) December 19, 2021
सकाळी नागपुरात झाला होता अपघात!
दरम्यान, इकडे नागपुरातही रविवारी सकाळी अपघात झाला होता. कार रिव्हर्स घेताना वाहन चालकाने बाळगलेली निष्काळजी रस्त्यावरील तरुणाला चांगलीच महागात पडली. ड्रायव्हरने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्यामुळे पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना ती जोरदार वेगाने मागे आली आणि कारने एकाला चिरडलं होते. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला, तर दोघे जण थोडक्यात बचावले होते. नागपुरात घडलेली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. मेन रोडच्या जवळच संबंधित चारचाकी गाडी पार्क करण्यात आली होती. ड्रायव्हर ती काढण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला होता.
इतर बातम्या –