Mumbai Fire News : भर पावसात पवईत अग्नितांडव, हिरानंदानी येथील सुपरमार्केटमध्ये भीषण आग, लाखों रुपयांचं सामान जळून खाक
Powai Fire Video : हिरानंदानी येथे इमारतीला लागलेल्या आगीच्या ठिकाणी बचावकार्य केलं जातंय.
मुंबई : मुंबईतील पवई (Mumbai Powai Fire) येथे असलेल्या हिरानंदानी येथील एका इमारतीला आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमध्ये (Mumbai Fire News) सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र लाखो रुपयांचं सामना या आगीत जळून खाक झालं. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी रवाना झाल्या. एकूण 12 गाड्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तैनात करण्यात आल्या. पवईच्या हिरानंदानी (Hiranandani Fire News) येथील हायको सुपरमार्केटमध्ये ही आग लागली होती. सव्वा सहा वाजता आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवणारे बंब आणि 9 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी रवाना झाल्या होत्या.
Level 2 Fire Reported in #powai #Hiranandani Heiko Mall
हे सुद्धा वाचाNo Casualty Reported So far, Fire Tenders rushed to the spot@mybmc @MumbaiPolice pic.twitter.com/T7uaRAtik6
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) July 7, 2022
सुदैवानं जीवितहानी नाही
हायको सुपरमार्केटमध्ये लागलेल्या आगीत सुदैवानं कुणीही अडकलं नव्हतं. तसंच कोणतीही जीवितहानी या आगीत झालेली नाही. मात्र लाखो रुपयांचं नुकसान या आगीमध्ये झालं आहे. तसंच सुपरमार्केटचाही कोळसा झालाय. नेमकी ही आग कशामुळे लागली, हे कळू शकलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जातेय.
महाराष्ट्र: मुंबई के हीरानंदानी पवई इलाके में शॉपिंग मॉल में आग लगी। मौके पर 12 फायर टेंडर मौजूद हैं। किसी के फंसे होने या घायल होने की सूचना नहीं है। pic.twitter.com/dWqMrBITKU
— ANI_HindiNews (@AHindinews) July 7, 2022
पवईत मुख्य रस्त्यावरच असलेल्या या आगीती तीव्रता दूरपर्यंत पाहायला मिळाली. धुराचे प्रचंड लोट हवेत पसरले होते. मुख्य रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्यांमध्ये या आगीमुळे भीती पसरली होती. आता ही आग नियंत्रणात आणण्यासोबत कुलिंग ऑपरेशन करण्याचं आव्हान सध्या अग्निशमन दलाच्या जवानांपुढे आहे.
Massive #fire broke out at #Rohdas #Hiranandani Powai. Avoid route major jam#MumbaiRains @MumbaiPolice @TrafficBOM pic.twitter.com/38nCVz4hjm
— Mohit Agarwal (@MohitAg31677690) July 7, 2022
भर पावसात अग्नितांडव
मुंबई गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन पावसात पवईत आगीची घटना घडल्यानं आश्चर्य व्यक्त केला जातंय. मुंबईत शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर कमी असला, तरी संततधार सुरुच आहेत. सध्या पवईच्या हिरानंदानी येथे इमारतीला लागलेल्या आगीच्या ठिकाणी बचावकार्य केलं जातंय. दरम्यान, आग लागल्यानं सुरु असलेल्या बचावकार्याचा फटका या मार्गावरील वाहतुकीला बसला. मोठी वाहतूक कोंडी या मार्गावर झाल्याचं पाहायला मिळालं.