Video : पहाटे 3 वा. चोरी, दुपारी 4 पर्यंत तिथेच झोपला, मग निघून गेला! बोरीवलीतील चोराचा नादच खुळा

Mumbai Gorai theft : सात जून रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास चोरीही ही घटना घडली.

Video : पहाटे 3 वा. चोरी, दुपारी 4 पर्यंत तिथेच झोपला, मग निघून गेला! बोरीवलीतील चोराचा नादच खुळा
अजब चोरी...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 12:21 PM

मुंबई : चोरी (Theft) करायची म्हणजे ती घाईघाईत, धावपळीत, गडबडीत करण्यासारखी गोष्ट आहे, असं कुणालाही वाटेल. आतापर्यंत समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्येही चोरांची धावपळ, पळापळ, झटापट असाच प्रकार दिसून येतो. पण एका चोराने चोरी केल्यानंतर पळून जाण्याआधी त्याच ठिकाणी झोप काढली. थोडा वेळा नाही, तर झोप पूर्ण होईपर्यंत हा चोर चोरी केलेल्या दुकानातच झोपून होता. पहाटे चोरी केली. मग झोप आली म्हणून तिथेच आडवा झाला. थकल्यामुळे पटकन डोळा लागला. मग दुपारपर्यंत काही त्याला जाग आलीच नाही. थेट तो दुपारीच उठला. दुपारी चार वाजता त्याला जाग आली आणि पाच वाजता तो चोरीचं सोनं घेऊन निघून गेला. हा सगळा प्रकार घडला मुंबईच्या (Mumba News) गोराईतील (Gorai Crime) एका सोन्याच्या दुकानात.

गोराईमध्ये चोरीच्या उद्देशानं एका चोरट्यानं दुकानां छत फोडलं आाणि दुकानात शिरला. यानंतर दुकानातील सोनं त्यानं आपल्या पिशवीत टाकलं आणि त्यानंतर त्यानं दुकानातून धूम ठोकली. पण त्याआधी त्यानं आपली झोपही याच दुकानात पूर्ण केली.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

सात जून रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास चोरीही ही घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. गोराईच्या पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं या चोराचा शोध घेत त्याला बेड्याही ठोकल्यात. सचिन लखन मंडल असं चोरी करणाऱ्याचं नाव आहे. तो 19 वर्षांचा असून आपली हौस भागवण्यासाठी तो चोऱ्या करत होता. अंमली पदार्थांचं व्यसन, ड्रग्ज यासाठी सचिन चोऱ्या करायचा. अखेर गोराईप पोलिसांनी सचिनला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा मालही जप्त केलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा सीसीटीव्ही व्हिडीओ :

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा चोर दागिने पिवळ्या रंगाच्या एका पिशवीत भरताना दिसलंय.

सध्या अटक करण्यात आलेल्या चोराची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय. त्याने इतरही अनेक दुकानांमध्ये अशाचप्रकारे चोरी केली असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.