शक्ती मिल गँगरेप प्रकरणात अंतिम निकालाकडे लक्ष, फाशीच्या शिक्षेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी
22 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागात असलेल्या शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला आपल्या सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तिथे गेली होती. तिथे पाच जणांनी तिच्यावर गँगरेप केला होता.
मुंबई : शक्ति मिल सामूहिक बलात्कार प्रकरणात मुंबई हायकोर्ट आज अंतिम निकाल देणार आहे. ऑगस्ट 2013 मध्ये मुंबईत महिला फोटोग्राफरवर गँगरेप झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने 2014 मध्ये सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावल्यानंतर आज अंतिम निकाल दिला जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
22 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागात असलेल्या शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला आपल्या सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तिथे गेली होती. तिथे पाच जणांनी तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप झाला होता.
विशेष म्हणजे एका 19 वर्षीय टेलिफोन ऑपरेटर तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. यातील आरोपी तेच होते. मार्च 2014 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने आधी यातील तिघा सामाईक आरोपींना दोषी ठरवले. त्यानंतर फोटोग्राफरवर तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातही दोषी ठरवले.
आरोपींना कोणती शिक्षा?
मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणी आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला शिक्षा सुनावली होती. सिराज खानला जन्मठेप, तर इतर तीन आरोपीना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. एका अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आले होते.
फाशीच्या शिक्षेला आरोपींतर्फे आव्हान
या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने 4 डिसेंबर 2014 रोजी दिलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींतर्फे आव्हान देण्यात आले होते. मात्र आरोपींच्या आव्हानाला मुंबई हायकोर्टाने 3 जून 2019 रोजी फेटाळून लावले होते. या प्रकरणात न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांचे खंडपीठ आज निकाल देणार आहे.
संबंधित बातम्या :
नगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या, धक्क्यातून अल्पवयीन प्रियकराचाही शेतात गळफास
आधी आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार, वेदनेने रडत होती म्हणून गळा दाबला, वाचा नेमकं काय घडले?