Mumbai Murder: जवळ झोपू देत नाही म्हणून बायकोची हत्या, मालाडमध्ये मर्डर! दगडाचा पाटाच डोक्यात घातला

Mumbai Malad Murder News : मालवणीतील यशोदीप को ऑपरेटीव्ह सोसायटीत शुक्रवारी रात्री धक्कादायक घटना घडली.

Mumbai Murder: जवळ झोपू देत नाही म्हणून बायकोची हत्या, मालाडमध्ये मर्डर! दगडाचा पाटाच डोक्यात घातला
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 7:09 AM

मुंबई : बायको जवळ झोपू देत नाही म्हणून नवऱ्याने तिची हत्या (Husband killed wife News) केली. ही थरारक घटना मालाडमधील (Mumbai Malad News) मालवणी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दगडाचा पाटा डोक्यात घालून नवऱ्याने आपल्या बायकोचा जीव घेतला. शुक्रवारी (15 जुलै) रात्री घडलेली ही घटना आता उघडकीस आली आहे. जवळ झोपू देण्यावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला आणि संतापतलेल्या पतीने दगडाचा पाटा उचलला आणि पत्नीच्या डोक्यातच घातला. त्यात विवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीलाही अटक (Mumbai crime News) करण्यात आली. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे.

मालवणीतील यशोदीप को ऑपरेटीव्ह सोसायटीत शुक्रवारी रात्री धक्कादायक घटना घडली. विजयमाला ज्ञानोबा बलाडे या 48 वर्षांच्या विवाहीत महिलेचा तिच्या पतीनेच खून केला. विजयमाला ही पती ज्ञानोबा यास जवळ झोपू देत नव्हती. यावरुन दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यावेळी संतापाच्या भरात ज्ञानोबा याने दगडाचा पाड उचलला आणि विजयमालाच्या डोक्यात घातला.

हे सुद्धा वाचा

ज्ञानोबाने विजयमालावर केलेल्या हल्ल्यामध्ये तिला जागीत मोठा आघात होऊन तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून घेत पती ज्ञानोबा बलाडे याला अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून ज्ञानोबाची चौकशी केली जाते आहे. तर मृत विजयमाला हीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलाय.

मालाडमध्ये 24 तासांत 2 हत्या

मालाडच्या मालवणीमध्ये चोवीस तासांच्या आत दोन हत्या झाल्यात. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. मालवणीतल्या अंबोडवाडीत एका अल्पवयीन मुलानं तरुणाची हत्या केली. बाथरुमजवळ आमनेसामने आले असताना दोघांमध्ये वाद झाला. या वादावेळी अल्पवयीन मुलाने सोबत आणलेला चाकू तौसिफ खान या तरुणाला भोसकला. बरगडीखाली चाकू खुपसला गेल्यानं तौसिफला गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

तौसिफ याला रुग्णालयातही घेऊन जाण्यात आलं होतं, पण तिथे उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांना त्याला मृत घोषित केलं. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.