Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिफ्ट आली, दार उघडलं, शिक्षिका आत शिरली, पण लिफ्टचं दार बंद होण्याआधी घडली थरारक घटना!

Mumbai teacher killed in lift : क्लास संपवून जेनेली फर्नांडिस सहाव्या माळ्यावरुन दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टाफरुममध्ये येण्यासाठी निघाल्या. दुपारचा एक वाजला होता. त्या लिफ्टपाशी आल्या. त्यांनी लिफ्ट यावी म्हणून बाहेरुन बटणही प्रेस केलं. लिफ्ट आली. दार उघडलं. पण त्यानंतर थरारक घटना घडली.

लिफ्ट आली, दार उघडलं, शिक्षिका आत शिरली, पण लिफ्टचं दार बंद होण्याआधी घडली थरारक घटना!
दुर्दैवी घटना.. Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 10:33 AM

मुंबई : तुम्ही जर नियमित लिफ्टने (Elevator Accident) प्रवास करत असाल तर सावधान! लिफ्टने प्रवास करणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकणारी एक घटना मुंबईत घडली. विशेष म्हणजे शाळेच्या लिफ्टमध्ये (School lift) घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका शिक्षिकेला (Mumbai Teacher Death) जीव गमवावा लागलाय. या शिक्षिकेचं वय 26 वर्ष होतं. याच वर्षी जून महिन्यात ती शाळेत कामाला लागली होती. अवघ्या दोन महिन्यातच या शिक्षिकेसोबत घडलेल्या घटनेनं शाळेतील सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय. लिफ्टमधून जाण्याच्या प्रयत्नात असताना या महिलेवर काळानं घाला घातलाय.

नेमकं काय घडलं?

जेनेली फर्नांडिस, वय 26, ही नवीन कामावर रुजू झालेली शिक्षिका होती. तिला दोन महिनेच झाले होते. मालाडच्या सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये ती नियमितप्रमाणे आपलं लेक्टर संपवून क्लास रुममध्ये येत होती. मालाडच्या पश्चिमेच्या चिंचोळी फाटक परिसरात असलेल्या या शाळेत शुक्रवारची दुपार नेहमीसारखीच होती.

तासिका संपवून जेनेली फर्नांडिस सहाव्या माळ्यावरुन दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टाफरुममध्ये येण्यासाठी निघाल्या. दुपारचा एक वाजला होता. त्या लिफ्टपाशी आल्या. त्यांनी लिफ्ट यावी म्हणून बाहेरुन बटणही प्रेस केलं. लिफ्ट आली. दार उघडलं. पण त्यानंतर थरारक घटना घडली.

हे सुद्धा वाचा

लिफ्टचं दार उघडताच जेनेली फर्नाडिस लिफ्टच्या आतमध्ये शिरल्या. पण यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट वर जाऊ लागली. जेनेली फर्नाडिंस मधल्या मध्ये लिफ्टमध्ये फसल्या गेल्या. त्यांना गंभीर जखम झाली. शाळेत या घटनेनं एकच खळबळ उडाली.

शाळा प्रशासनाने तातडीने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरुण शिक्षिकेला रुग्णालयात नेलं. पण लाईफलाईन रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केल्यानंतर शाळेसह या महिलेच्या कुटुंबीयांच्याही पायाखालची जमीनच सरकली.

मालाड पोलिसांनी या घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मालाड पोलिसांकडून आता या घटनेची सखोल चौकशी केली जातेय. लिफ्टमध्ये बिघाड झाला होता का? या महिलेच्या मृत्यूला लिफ्ट मेन्टेनन्स कारणीभूत ठरला की निष्काळजीपणा, याचा कसून तपास केला जातो आहे. शाळेच्या इतर शिक्षकांचेही जबाब आता पोलिसांकडून नोंदवून घेतले जाणार आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.