मुंबईत 21 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या, 36 वर्षीय तरुणाला उत्तर प्रदेशातून अटक

मॉडेलिंगसाठी वारंवार पैशांची मागणी करत असल्याच्या कारणावरुन आरोपी विशाल ठाकूर आणि त्याची लिव्ह-इन जोडीदार वर्षा गोयल यांच्यात सातत्याने वाद होत असल्याची माहिती आहे. तसेच ती इतर पुरुषांशी बोलल्याचंही त्याला आवडत नव्हतं, असं पोलिसांनी सांगितलं.

मुंबईत 21 वर्षीय लिव्ह इन पार्टनरची हत्या, 36 वर्षीय तरुणाला उत्तर प्रदेशातून अटक
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 12:03 PM

मुंबई : मीरा-भाईंदर वसई-विरार गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील बस्ती येथून रविवारी एका 36 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या 21 वर्षीय पार्टनरचा त्याने खून केल्याचा आरोप आहे. वारंवार पैशांची मागणी आणि परपुरुषांशी मारलेल्या गप्पा खटकल्यामुळे तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

मॉडेलिंगसाठी वारंवार पैशांची मागणी करत असल्याच्या कारणावरुन आरोपी विशाल ठाकूर आणि त्याची लिव्ह-इन जोडीदार वर्षा गोयल यांच्यात सातत्याने वाद होत असल्याची माहिती आहे. तसेच ती इतर पुरुषांशी बोलल्याचंही त्याला आवडत नव्हतं, असं पोलिसांनी सांगितलं. गेल्या महिन्यात वसईतील एका फ्लॅटमध्ये हा खून झाला होता. फ्लॅटमधून निघणाऱ्या उग्र दुर्गंधीची तक्रार शेजाऱ्यांनी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.

मॉडेलिंगसाठी चार वर्षांपूर्वी मुंबईत

अटक करण्यात आलेला आरोपी विशाल ठाकूर आणि मयत तरुणी वर्षा गोयल हे दोघे वसईतील जीवन नगर येथील अदानी अपार्टमेंटमधील इमारतीत भाड्याने राहत होते. मूळची मध्य प्रदेशचा रहिवासी असलेली आणि कॉलेज अर्धवट सोडलेली वर्षा गोयल 2017 मध्ये मॉडेल बनण्यासाठी मुंबईत आली होती. राहण्यासाठी जागा शोधत असताना तिची गाठ बांधकाम व्यवसायात लागणारे साहित्य पुरवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या विशाल ठाकूर याच्याशी झाली.

2017 पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये

आरोपीच्या म्हणण्यानुसार, दोघे 2017 पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. अलिकडे वर्षाने मॉडेल बनण्यासाठी त्याच्याकडे 50,000 ते 1 लाख रुपये मागायला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे ती इतर पुरुषांशी गप्पा मारत असल्याचेही त्याला आवडत नसे, अशी कबुली विशालने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

बाथरुममध्ये बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह

विशालने त्यांच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्येच वर्षाची गळा दाबून हत्या केली आणि तो उत्तर प्रदेशातील बस्ती येथील त्याच्या गावी पळून गेला होता. यूपीमधील स्थानिक स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) मदतीने त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ही हत्या 8 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान केव्हातरी घडली होती. जेव्हा त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले, तेव्हा त्यांच्या फ्लॅटच्या बाथरूममध्ये बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत वर्षाचा मृतदेह आढळून आला होता.

संबंधित बातम्या :

पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नाशिकच्या तरुणाचा आयुष्याला पूर्णविराम

एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास, प्रेयसीच्या शेतात प्रेमी युगुलाचा करुण अंत

मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले 10 लाख बिटकॉईनमध्ये बुडाले, वसईतील व्यापाऱ्याचा लुटीचा बनाव

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.