Mumbai Crime : क्षुल्लक कारणातून वाद विकोपाला गेला, शेजाऱ्यांनी जे केलं ते पाहून अंगावर काटा येईल !

शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद होत होता. अखेर सर्व शेजाऱ्यांनी मिळून 45 वर्षीय इसमाला अद्दल घडवली. यावेळी जे घडलं त्याने मुंबीत खळबळ उडाली.

Mumbai Crime : क्षुल्लक कारणातून वाद विकोपाला गेला, शेजाऱ्यांनी जे केलं ते पाहून अंगावर काटा येईल !
क्षुल्लक कारणातून शेजाऱ्याने शेजाऱ्याला संपवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 9:30 AM

मुंबई / 1 सप्टेंबर 2023 : क्षुल्लक वादातून शेजाऱ्यांनी एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील मालाड परिसरात घडली. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन महिलेसह पाच आरोपींना अटक केली आहे. एजाज अब्दुल वासार शेख असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर मन्सूर सय्यद अफसर अली उर्फ सिट्टी, साबीर बाबू अन्सारी, अकबर अमीन हसन अन्सारी, यास्मिन तौहीन खान आणि रेश्मा मनसूद सय्यद अशी अटक आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

क्षुल्लक वादातून शेजाऱ्यांकडून हत्या

मालाडमधील मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथे मयत एजाज अब्दुल वासार शेख हे राहत होते. शेख यांचे येण्या-जाण्यावरून रोज शेजाऱ्यांशी भांडण होत असे. नेहमीप्रमाणे 30 ऑगस्ट रोजी एजाजचे पुन्हा शेजाऱ्यांशी भांडण झाले. या भांडणातून शेजाऱ्यांनी मिळून एजाजला काठ्या, रॉड, लाथा-बुक्क्यांनी इतका मारहाण केली. या मारहाणीत एजाज गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पाचही आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

यानंतर एजाज यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन मालवणी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 11 ने पाच आरोपींना अटक करत न्यायाललयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना अटक केली आहे. आरोपी मन्सूर सय्यद अफसर अली उर्फ सिट्टी याला अक्सा मालाड पश्चिम येथून अटक केली तर अन्य 4 आरोपी साबीर बाबू अन्सारी, अकबर अमीन हसन अन्सारी, यास्मिन तौहीन खान आणि रेश्मा मनसूद सय्यद यांना मालवणी परिसरातून अटक केली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.