BREAKING | सोनू निगम याच्या घरी चोरी करणारा सापडला, ‘हाच’ व्यक्ती निघाला चोर, विशेष म्हणजे….

गायक सोनू निगम यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती समोर आलेली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत आरोपीला शोधून काढत त्याच्या कोल्हापुरातील घरी जावून पैसे हस्तगत केले आहेत.

BREAKING | सोनू निगम याच्या घरी चोरी करणारा सापडला, 'हाच' व्यक्ती निघाला चोर, विशेष म्हणजे....
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 11:37 PM

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. गायक सोनू निगम यांच्या घरी चोरी करणाऱ्याला शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. या आरोपीने तब्बल 72 लाखांची चोरी केलेली. पोलिसांनी आरोपीला पकडलं असता त्याच्याकडे एकूण 70 लाख 70 हजार रुपये मिळाले आहेत. उर्वरीत पैसे आरोपीने खर्च केल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ओशिवरा पोलिसांनी आरोपीच्या कोल्हापूर येथील घरातून चोरी केलेली रक्कम हस्तगत केलीय. पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत आरोपीला शोधून काढत रक्कम हस्तगत केली आहे. रमजान मुजावर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक सोनू निगम यांच्या बहीण निकीता निगम यांनी 22 मार्चला चोरीची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सोनू निगम यांच्या वडिलांच्या घरी तब्बल 72 लाखांची चोरी झाल्याची तक्रार करण्यात आलेली. त्या तक्रारीनुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी अधिकचा तपास केला असता महत्त्वाची माहिती समोर आली. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अभिनव देशमुख यांनी या प्रकरणी केलेल्या कारवाईबद्दल सविस्तर माहिती दिली.

सोनू निगम यांच्या एका गाडीच्या ड्रायव्हरने आठ महिन्यांपूर्वी नोकरी सोडलेली. त्याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याच दृष्टीकोनाने तपास सुरु केला. पोलिसांनी त्या ड्रायव्हरचा सलग दोन दिवस शोध घेतला. अखेर पोलिसांनी त्याला दोन दिवसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला कोर्टात सादर करण्यात आलं. त्यानंतर त्याची पोलीस कोठडी मागण्यात आली. कोर्टाने पोलीस कोठडी मान्य केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीतून आरोपीने चोरलेले पैसे नेमके कुठे ठेवले होते याबाबत माहिती दिली. त्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्याची टीम थेट कोल्हापूरला गेली. पोलिसांनी तिथे चोरट्याकडून लपवलेल्या ठिकाणची झडती घेण्यात आली आणि 72 लाखांपैकी 70 लाख 70 हजार रुपये पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी ते पैसे जप्त केले.

या प्रकरणात आरोपीला सहकार्य करण्यात आणखी कोणी सहभागी होतं का? याचा तपास ओशिवरा पोलिसांकडून करण्यात येतोय. आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीवर याआधीच दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा हा कोल्हापुरात दुचारी चोरी प्रकरणी दाखल आहे. तर दुसरा गुन्हा हा 2020 साली सांताक्रूझ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.